Agriculture news in Marathi Heavy rains continue in Konkan | Agrowon

कोकणात पावसाचा जोर कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली आहे. सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.

पुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली आहे. सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. 

गुरुवारी (ता. २३) कोकणातील रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन येथे १३१ मिलिमीटर, म्हसळा येथे १२७ मिलिमीटर, तर नाशिक जिल्ह्यातील ओझर खेडा येथे १६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. तर पालघर रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाची जोरदार पाऊस पडला. 

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : 
कोकण :
पालघर : मोखेडा ९६, विक्रमगड ८०, वाडा ६१, रायगड : कर्जत ५२, खालापूर ९१, महाड ५४, माथेरान ६१, म्हसळा १२७, पोलादपूर ७२, रोहा ५६, श्रीवर्धन १३१, तळा ५९, रत्नागिरी : चिपळूण ६४, दापोली ८०, गुहागर ५४, हर्णे ५३, लांजा ५१, मंडणगड ९०, राजापूर ५४, सिंधुदुर्ग : देवगड ५३, रामेश्‍वर ७२, ठाणे : शहापूर ६८.

मध्य महाराष्ट्र : नगर : अकोले ४२, धुळे : धुळे ४९, कोल्हापूर : गगनबावडा ४८, नंदूरबार : तळोदा ४०, नाशिक : हर्सूल ८५, ओझरखेडा १६८, पेठ ७२, सुरगाणा ६३, त्र्यंबकेश्‍वर ४७, पुणे : लोणावळा कृषी ६९.

मराठवाडा : औरंगाबाद : कन्नड ५६, बीड : अंबाजोगाई ३५, जालना : बदनापूर ३६, लातूर : चाकूर ३८, देवणी ३०, नांदेड : अर्धापूर ३२, कंधार ३२, परभणी : गंगाखेड ५५.

विदर्भ : बुलडाणा : लोणार ३२, नागपूर : नरखेडा ४०.


इतर अॅग्रो विशेष
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
तरुणाने शेळीपालनातून बसविला चांगला जमपदव्युत्तर पदवी घेतलेल्या तुकाराम गरड यांनी (...
जुन्नर परिसर झाला टोमॅटोचे क्लस्टर जुन्नर (जि. पुणे), संगमनेर (जि. नगर) व परिसरातील...
तापमानातील तफावत वाढलीपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
शेतकऱ्यांना तत्काळ कर्जासाठी कृषी कर्ज...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरीत्या...
तलाठ्यांच्या संपामुळे कामे खोळंबली नगर : तलाठ्यांच्या कामकाजासंदर्भात समन्वय...
तेलबिया आणा अन् खाद्यतेल घेऊन जापुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर...
पूर्व विदर्भात करडईची होणार चार हजार...नागपूर ः देशाची खाद्यतेलाची गरज भागविण्याकरिता...
सोयाबीनच्या आवकेसह मागणीही वाढणारपुणे : देशभरातील बाजारात चालू सप्ताहात दैनंदिन...
परभणी कृषी विद्यापीठाकडून कुशल...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यंदा...
फळबागकेंद्रित पीक पद्धतीतून साधला...परभणी जिल्ह्यातील राधेधामनगाव (ता. सेलू) येथील...
शाश्वत विकासाची दिशा देणारे मराठवाडा...शाश्वत ग्राम आणि शेती विकासाचा अविरत वसा घेऊन...
राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील...कोल्हापूर : नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर...