Agriculture news in Marathi Heavy rains continue in some parts of Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूच

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे त्याठिकाणी पूरस्थिती कायम असून वेंगुर्ला होडावडा येथील एका घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्या कुटुंबातील पाच सदस्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील भिजवणी आणि हळवी भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे त्याठिकाणी पूरस्थिती कायम असून वेंगुर्ला होडावडा येथील एका घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे त्या कुटुंबातील पाच सदस्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील भिजवणी आणि हळवी भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी रात्रभर जिल्ह्यातील वैभववाडी, मालवण, वेंगुर्ला, सांवतवाडी, देवगड या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वेंगुर्ला तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. सलग चौथ्या दिवशी या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. होडावडा पुलावरून पुराचे पाणी वाहत असून होडावडा येथील मारीया आंद्रुलुईस ब्रिटो यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे त्या कुटुंबातील मारीया यांच्यासह पीटर आंद्रुलुईज ब्रिटो, लॉरेन्स आंद्रुलुईस ब्रिटो, त्रिजा पीटर ब्रिटो, विल्यम पीटर ब्रिटो या पाच जणांना नातेवाइकांच्या घरी हलविले आहे.

होडावडा पुलानजीकच्या कित्येक एकर भातशेतीमध्ये पुराचे पाणी घुसले असून येथील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कणकणली आणि वैभववाडी या दोन तालुक्यांतील सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत.मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कापणीला आलेली भिजवणीची भातशेती आणि हळवी भातपिकांचे नुकसान सुरू झाले आहे. हळवी भातपिके काही भागात कापणीला आली आहेत. परंतु परिपक्व झालेल्या या भातपिकांचे पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याच्या किनारपट्टीला देखील पावसाला जोर अधिक आहे. मालवणात समुद्र देखील खवळलेला आहे. त्यातच हवामान खात्याने जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविल्यामुळे सर्वांत सुरक्षित मानल्या गेलेल्या देवगड बंदरात शेकडो नौकांनी आश्रय घेतला आहे. दरम्यान बुधवारी दुपारी काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...