Agriculture news in Marathi, Heavy rains everywhere in Satara district | Agrowon

सातारा जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पिकांत पाणी साचल्याने काढणीला नुकसान सुरू आहे. 

जिल्ह्यात शनिवारी व रविवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे.  माण, खटाव तालुक्याच्या अपवाद वगळता इतर नऊ तालुक्यांत ३० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सध्या खरिपातील पिकांची काढणी आलेली आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. पिकांत पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेली पिके भिजत असल्याने नुकसान सुरू होत आहे.

सातारा : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संततधार सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, पिकांत पाणी साचल्याने काढणीला नुकसान सुरू आहे. 

जिल्ह्यात शनिवारी व रविवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे.  माण, खटाव तालुक्याच्या अपवाद वगळता इतर नऊ तालुक्यांत ३० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सध्या खरिपातील पिकांची काढणी आलेली आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. पिकांत पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेली पिके भिजत असल्याने नुकसान सुरू होत आहे.

सोयाबीन, भात, स्ट्रॉबेरी, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी सलग पाच तास परतीच्या मुसळधार पावसाने पाटण तालुक्याला झोडपले. ओढे-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडून जवळच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान केले. या तालुक्यातही सोयाबीन भिजले असून, ज्वारी काळी पडू लागली. जावळी व महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी व भाताचे नुकसान सुरू आहे. 

आले व हळदीच्या पिकांत पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात २४ तासांत सरासरी ५१.२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम होता त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत.  

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
सातारा ८४.८३, जावळी ६२.७३, पाटण ५३.००, कराड ३८.९२, कोरेगाव ३४.४४, खटाव २७.८२, माण २२.६२, फलटण ४७.८९, खंडाळा ८७.९५, वाई ६२.५७, महाबळेश्वर ६०.४८.


इतर ताज्या घडामोडी
माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधननगर, : नगर शहराचे माजी आमदार, तत्कालीन युती...
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील...लातूर : काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री...
परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर...परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत...
लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर...उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी,...
'रासाका' लवकर सुरू करा, शेतकऱ्यांची...नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून निफाड...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांची स्थिती बिकट...
यावल, रावेरमध्ये मका पिकावर लष्करी अळी...जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव, डांभुर्णी,...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या तुरळक...नाशिक : जिल्ह्यात खरीप हंगामातील कांदा लागवडीचा...
सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ट...सोलापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या निकृष्ठ...
अकोले तालुक्‍यात भात लागवडी रखडल्यानगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्‍याच्या उत्तर...
गोंदियाची पीक कर्ज वाटपात आघाडीगोंदिया : पीक कर्ज वाटपात जिल्ह्याने आघाडी घेत...
जुन्नर, नारायणगावात टोमॅटोचे दर टिकूनपुणे ः जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नकाअकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या...
माळशिरस, करमाळ्यात मक्याची ३० हजार...सोलापूर  ः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती...
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊसरत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या...
चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा...
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवातकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून...
असे होते ग्लायफोसेट तणनाशकाचे निसर्गात...केंद्र सरकारकडून नुकताच मसुदा आदेश प्रसिध्द...
जळगावात गवार २००० ते ४२०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यात पावसाच्या अंदाजानुसार ऑगस्ट...एकंदरीत या वर्षी मराठवाड्यात बहुतांश भागात...