Agriculture news in marathi Heavy rains, floods in Akola 33 thousand hectares hit | Agrowon

अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार हेक्टरला फटका 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 जुलै 2021

अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे १५०पेक्षा अधिक जनावरे दगावली असून, पुरात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे १५०पेक्षा अधिक जनावरे दगावली असून, पुरात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. 

गुरुवारी (ता.२२) मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अकोला, बार्शी टाकळी व इतर तालुक्यात हाहाकार उडाला होता. या नुकसानीचे १३ पथकांकडून तातडीने पंचनामे केले जाणार आहेत. या बाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी तातडीची बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. 

पावसामुळे अकोट तालुक्यातील पनोरी येथील ४५ वर्षीय व्यक्ती पठार नदीच्या पुरामध्ये वाहून गेला असून, त्याचे शोधकार्य सुरू आहे. या आपत्तीत जिल्ह्यात २२३७ घरांचे नुकसान झाले आहे. ३३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शिवाय १५३ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. अद्याप अंतिम अहवाल आलेला नसल्याने यात मोठ्या वाढीची शक्यता आहे. 
मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे ४० लोकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच उगवा गावाच्या शेतात पुरामुळे अडकलेल्या दोन लोकांना एसडीआरएफ पथकाने सुरक्षित बाहेर काढले आहे.

अतिवृष्टीचा पंचनामा करण्याकरिता तलाठी, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर येथील एसडीआरएफ पथक व स्थानिक आपत्ती पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी सातपुड्याच्या पायथ्याच्या भागात जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे त्या भागातील नदी-नाल्यांना पूर आले आहेत. दिवसभर संततधार पाऊस सर्वत्र पडत होता. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांमध्ये मोठे पाणी साचल्याने नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. 

सतर्कतेचा इशारा 
नागपूर येथील हवामान विभागाच्या संदेशानुसार मंगळवारपर्यंत (ता.२७) कालावधीत जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम अधिक स्वरूपाचा पाऊस तसेच विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीसाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी आपले मुख्यालयी उपस्थितीत राहून सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. 

बुलडाणा, वाशीममध्ये संततधार 
बुलडाणा आणि वाशीममध्‍ये संततधार पाऊस सुरू आहे. अकोल्याच्या तुलनेत या दोन जिल्ह्यात हलका पाऊस सुरू असून, हा पाऊस पिकांना पोषक आहे. मात्र, अजून काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. मात्र, या दोन जिल्ह्यांना अद्याप पावसाचा तडाखा बसलेला नाही. पिके जोमाने वाढत आहेत. 

  • अकोल्यातील परिस्थिती
  • अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान 
  • पुरामुळे १५०पेक्षा अधिक जनावरे दगावली, वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू 
  • मुसळधार पावसामुळे अकोला, बार्शी टाकळी व इतर तालुक्यात हाहाकार उडाला 
  • तेरा पथकांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश 
  • जिल्ह्यातील २२३७ घरांचे नुकसान 
  • मोर्णा नदीला पूर, ४० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले 

 


इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...