गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधनाकारक वाढ झाली आहे.
 Heavy rains in Gangapur dam area
Heavy rains in Gangapur dam area

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात समाधनाकारक वाढ झाली आहे. पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिला, तर धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यातील एकूण २३ मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये येवा वाढल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. तो ८७ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यात ८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर, गंगापूर, चणकापूर व पुनद भरण्याच्या मार्गावर आहेत.

जिल्ह्यात पालखेड धरण समूहातील तिसगाव धरणात सर्वात कमी म्हणजेच अवघा ३५ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. शनिवारी (ता.५) गंगापूर धरणाच्या क्षेत्रात ९५, तर काश्यपीच्या परिसरात ४६ मिमी पावसाची नोंद झाली. 

रविवारी (ता.६) मध्यरात्री गौतमी धरणाच्या परिसरात ४६ मिमी पाऊस पडल्यामुळे धरणसाठ्यात वाढ झाली. धरणाचा एकूण संकल्पित पाणीसाठा ५६३० दलघफू आहे. सोमवारी (ता.७) धरणात ५४३५ दलघफु इतका साठा झाला आहे. 

दारणा, गिरणातून विसर्ग सुरूच

इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार कायम असल्याने दारणा धरण समूहात समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे भावली, वालदेवी, कडवा या धरणात पाण्याची आवक कायम आहे. ही धरणे भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून विसर्ग कायम आहे. यासह गिरणा धरण समूहातून चणकापूर भरण्याच्या मार्गावर आहे. तर, हरणबारी व केळझर पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com