अतिपावसाने खानदेशात कांदा लागवड रखडली

जळगावः खानदेशात कांदा लागवड रखडत सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या रोपांचे मध्यंतरी उष्णता व मागील १५ दिवसांत अतिपावसात नुकसान झाले आहे. यामुळे लागवड रखडत सुरू आहे.
Heavy rains hampered onion cultivation in Khandesh
Heavy rains hampered onion cultivation in Khandesh

जळगाव ः खानदेशात कांदा लागवड रखडत सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या रोपांचे मध्यंतरी उष्णता व मागील १५ दिवसांत अतिपावसात नुकसान झाले आहे. यामुळे लागवड रखडत सुरू आहे. 

रोपांची उपलब्धता कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड कमी करण्याचे नियोजन केले आहे. लागवड धुळे जिल्ह्यात सुरू आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातही काही भागात लागवड सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा या भागात लागवड काही क्षेत्रात झाली आहे. ही लागवड समारे दीड हजार हेक्टरपर्यंत झाल्याचा अंदाज आहे. 

जळगाव जिल्ह्यातही सुमारे २०० ते ३०० हेक्टरवर लागवड झाल्याची माहिती आहे. ही लागवड चोपडा, जामनेर, यावल, जळगाव या भागात झाल्याचे सांगण्यात आले. खानदेशात कांद्याची लागवड सुमारे १४ ते १५ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत होते. त्यासंबंधी अनेक शेतकऱ्यांनी  कंदा रोपवाटिका तयार केल्या. चोपडा तालुक्यातील अडावद, गणपूर, मराठे आदी गावांमध्ये व परिसरात रोपवाटिका जुलैमध्येच तयार झाल्या.

या रोपवाटिकांमधील रोपांची विक्रीही काही शेतकऱ्यांनी केली. यंदा कांदा रोपवाटिकांची स्थिती बरी नसल्याने रोपांना चांगले दर मिळाले. सद्यःस्थितीत रोपे कमी उपलब्ध आहेत. तर अनेक रोपवाटिकांमधील रोपांची वाढ हवी तशी नाही. यामुळे लागवड लांबणार आहे. 

दरवर्षी ही लागवड ऑगस्टअखेर पूर्ण केली जायची. परंतु, यंदा ही लागवड सप्टेंबरच्या मध्यात सुरू होईल, अशी स्थिती आहे. तसेच लागवडही कमी होण्याचे संकेत आहेत. कांदा लागवडीसाठी अनेक शेतकरी वेळेत शेतांमध्ये पूर्वमशागतही करू शकले नाहीत. कारण, सतत पाऊस सुरू होता. तण वाढले आहे. त्यावर तणनाशकांची फवारणी करावी लागत आहे. वाफसा पावसामुळे नाहिसा झाला आहे. या आठवड्यात स्वच्छ सूर्यप्रकाश असला, तर पूर्वमशागतीच्या कामाला गती येवू शकेल. 

यंदा कांद्याचे दर उन्हाळ्यात कमी होते. खर्चही निघाला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड टाळण्याचेही ठरविले आहे. खानदेशात यंदा खरिपातील कांद्याची लागवड सुमारे पाच ते सहा हजार हेक्टरवर होईल, अशी स्थिती आहे. 

यंदा कांदा रोपवाटिकांचे अतिपावसात नुकसान झाले. कांद्याला चांगले दर नसल्याने अनेकांनी लागवड टाळण्याचे ठरविले आहे. यामुळे लागवडही कमी होईल.  - आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे (जि.धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com