agriculture news in marathi Heavy rains hit 17,000 hectares of crops in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार हेक्टर पिकांना फटका

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ३९ हजार १२० शेतकऱ्यांचे १७ हजार ७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे ३९ हजार १२० शेतकऱ्यांचे १७ हजार ७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु आहेत. अनेक भागातील पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून संतताधर पाऊस सुरु होता. ऑक्टोबर महिन्यात सलग दहा दिवस दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यासह अन्य भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सर्वच नद्या, ओढे तुडुंब भरून वाहत होते. खरीप पिकांची काढणी सुरु असतानाच अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिके पाण्यात बुडाली. आजही शेतात पाणी आहे.

सोयाबीन, भात, ज्वारी, बाजरी, कडधान्य, भुईमूग पिके शेतातच कुजली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच मिळाले नाही.

दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे करण्यास सुरवात केली आहे. ३ लाख ४१ हजार ४७ हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला होता. त्यापैकी ३९ हजार १२० शेतकऱ्यांचे १७ हजार ७७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी ७ हजार हेक्टरवरील क्षेत्रातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. उर्वरित क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे आठ दिवसात पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. 

२५० कोटींहून अधिक नुकसान

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन, कडधान्ये, ज्वारी यासह भाजीपाला पिकांचे सुमारे २५० कोटीहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 


इतर बातम्या
पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा...नाशिक ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात...नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार...
कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा...गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले...
बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने...बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी...
मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च,...अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील...
`नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना...नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे...
बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरूपुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये कांदा चाळ अनुदानासाठी उपोषणनगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर...
जळगाव जिल्ह्यात केळीच्या विमा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून...
वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहारकऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील...
सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार...सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध...
पीकविमा हप्ता २७ नोव्हेंबरपूर्वीच भरा...सिंधुदुर्ग : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील...
‘वान’च्या पाण्याविरुद्ध नागरिकांचे धरणे अकोला : तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ...
खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यताजळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर...
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन...जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे...
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय)...
सटाणा तालुक्यातील ऊस जळण्यास महावितरणच...नाशिक : सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन...