अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला फटका

यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या पावसाने मराठवाड्यातील अंदाजे २३ लाख ३० हजार ४६६ हेक्टरला फटका बसला आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी जवळपास ६९.७२ टक्के पंचनामे २० ऑक्टोबर अखेर पूर्ण झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
Heavy rains hit 23 lakh hectares in Marathwada
Heavy rains hit 23 lakh hectares in Marathwada

औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या पावसाने मराठवाड्यातील अंदाजे २३ लाख ३० हजार ४६६ हेक्टरला फटका बसला आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रापैकी जवळपास ६९.७२ टक्के पंचनामे २० ऑक्टोबर अखेर पूर्ण झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. आधी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची वाटचाल सुरू असतानाच कमी-अधिक प्रमाणात मराठवाड्यात काही भागात पडत असलेला पाऊस नुकसानीची व्याप्ती वाढविण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे.

गत खरिपात मराठवाड्यात पाऊस नसल्याने अनेक भागातील पिके वाया गेली होती. यंदा मात्र अपेक्षाच्या पुढे जाऊन बरसणारा पाऊस पिकांच्या मुळावर उठला  आहे. मराठवाड्यातील  औरंगाबाद, जालना व हिंगोली  या तीन जिल्ह्यांतील १००० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या पाच जिल्ह्यांत ८०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आजवर मराठवाड्यात सरासरी ९५६.२ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या १२८ टक्के पाऊस झाला आहे.

 बुधवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील भेंडाळा मंडळात ७०.५० मिलिमीटर तर तुर्कांबाद मंडळात ९६.२५ मिलिमीटर तर अनेक ठिकाणी तुरळक, हलका मध्यम झालेला पाऊस पावसाच्या सक्रीयतेची साक्ष देतो आहे. प्राप्त माहितीनुसार यंदा मराठवाड्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने जवळपास ३० लाख ९७६६ शेतकऱ्यांच्या २३ लाख ३० हजार ४६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

नुकसान झालेल्या या पिकांच्या पंचनाम्याचे आदेश शासनस्तरावरून निघाल्यानंतर २० ऑक्टोबर अखेरपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील जवळपास २२ लाख ४ हजार ६०५ शेतकऱ्यांच्या १६ लाख २४ हजार ७१५ हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले होते. तर ७ लाख ६३ हजार ३६१ शेतकऱ्यांच्या ७ लाख ५ हजार ७५० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम बाकी होते.

पंचनामे बाकी असलेल्या शेतकऱ्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८९००, जालनामधील ६७७०, परभणीमधील १ लाख ५५ हजार ७०९, हिंगोलीतील ६४ हजार २१३, नांदेडमधील १ लाख १८ हजार ९९०, बीडमधील २ लाख ४२ हजार २७६, लातूरमधील ६८ हजार ७४९ तर उस्मानाबाद मधील ९७ हजार ७४८ शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com