Agriculture news in Marathi Heavy rains hit 4,000 hectares in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार हेक्टरला फटका

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस आहे. पिकांची स्थितीही बरी आहे. मात्र शेतीवरील नैसर्गिक आपत्तीची मालिका थांबायला तयार नाही. यंदा मार्च महिन्यापासून जुलैपर्यंत जिल्ह्यामधील तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले झाले आहे.

नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस आहे. पिकांची स्थितीही बरी आहे. मात्र शेतीवरील नैसर्गिक आपत्तीची मालिका थांबायला तयार नाही. यंदा मार्च महिन्यापासून जुलैपर्यंत जिल्ह्यामधील तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले झाले आहे.

या आपत्तीत साडेतीनशे गावांतील नऊ हजार शेतकरी बाधित झाले. झालेल्या नुकसानीत सुमारे पंचवीस कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरकारी नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी १२ कोटीची गरज आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

नगरसह राज्यातील बहुतांश भागात यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. मात्र तरीही सातत्याने शेतीवर आपत्ती येतच आहे. मार्च ते जुलै या महिन्यात वेगवेगळ्या कारणाने पिकांचे नुकसान झाले आहे. खास करून अधिक चक्री वादळ आणि अधिक च्या पावसानेच नुकसान झाले आहे. जसे नुकसान होईल त्यानुसार प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. सर्वाधिक नुकसान जूनमध्ये झाले आहे.

या नुकसानीत पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान ग्राह्य धरले नाही. जिल्हाभरात शेडनेट, पॉलिहाऊसचही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी बारा कोटी रुपये भरपाई देण्याला हवे आहेत.

सप्टेंबरमध्येही मोठे नुकसान  
नगर जिल्ह्यातील नेवासा, नगर, पारनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात आॅगस्ट महिन्यात फारसे नुकसान नसले तरी सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे. या महिन्यात बाजरी, कापूस, सोयाबीन, भुईमुगासह ऊस व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचा अजून अहवाल आलेला नसला तरी या महिन्यातही शेतीवर मोठी आपत्ती आल्याचे जाणकार सांगतात.

शेतकऱ्यांना सोसावे लागणार नुकसान
शासनाच्या नियमानुसार आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा जास्ती नुकसान झाले तरच भरपाई दिली जाते. मात्र ३३ टक्क्यापेक्षा कमी झालेले नुकसानही अधिक आहे. त्या नुकसानीची प्रशासन अथवा कृषी विभाग नोंद ठेवत नाही, मात्र जाणकारांच्या माहितीनुसार गेल्या पाच महिन्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्यातूनही नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारण दहा कोटीचा फटका बसल्याचा अंदाज आहे. मात्र त्याची भरपाई मिळणार नसल्याने ते नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागणार आहे.  

 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...