Agriculture news in marathi Heavy rains hit crops in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटका

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

औरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी या सहा जिल्ह्यात पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम आहे.

औरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी या सहा जिल्ह्यात पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम आहे. गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबादमधील तीन व लातूर मधील एका मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. तर, इतर मंडळांमध्ये दमदार पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील २५ मंडळांत पाऊस झाला. मांजरी मंडळात सर्वाधिक ९२.५ मिलिमीटर, त्यापाठोपाठ गंगापूर ७१.८, सिद्धनाथ ७१.३ मिलिमीटर पाऊस झाला. भेंडाळा मंडळात ३८, हरसुल ३७.८, डोनगाव २२.५, वैजापूर २३.८, तर लासुरगाव मंडळात ३६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यातील १९ मंडळात तूरळक ते हलका पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील कासारशिरसी मंडळात सर्वाधिक ११९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील इतर ५० मंडळांत मध्यम, दमदार पाऊस झाला. कासारखेडा मंडळात २५ मिलिमीटर, किल्लारी ३७.५ ,अंधोरी ३१.३, निलंगा ४६.८, निटुर ४३.८, कासार बालकुंदा ५६, अंबुलगा ५८ , मदनसुरी ३६, हलगरा ५४.५, भातंगळी ५१, देवणी २४.५, बोरोळ २४.३, तर साकुर मंडळात ५४.५ मि.मी पाऊस झाला.  

बीड जिल्ह्यातील ५२ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील सिरसदेवी मंडळात सर्वाधिक ३२.३ मिलिमीटर त्यापाठोपाठ नित्रुड १७, अंबाजोगाई १५.८, तर, बनसारोळा मंडळात १८.८ मि.मी पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३३ मंडळांत पाऊस झाला. दरम्यान गुरुवारी (ता. १७) दुपारी साडे बारापासून पाथरूड, दुधोडी, सावरगाव, उमाचीवाडी, बागलवाडी, वडाचीवाडी परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होता.

परभणी, हिंगोलीत जोरदार

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५८ मंडळांत गुरुवारी (ता.१७) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. ३० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.

परभणी, जिंतूर, पालम तालुक्यातील मंडळामध्ये जोरादर पाऊस झाला. पिंगळी (ता.परभणी) मंडळात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील मंडळामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.


इतर अॅग्रो विशेष
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...
रिसोर्स बॅंक ः स्तुत्य उपक्रमहवामान बदलाच्या चरम सीमेवर आता आपण आहोत. खरे तर...
कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...मुंबई : कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा...
‘बायोमिक्स’ विक्रीतून कृषी विद्यापीठाला...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
जरासं पहा ना साहेब, पाणीच पाणी वावरात...परभणी ः सदोष बियाण्यांमुळे दुबार, तिबार पेरणी...
परतीचा मॉन्सून राज्यातून चार दिवसांत...पुणे ः परतीच्या पाऊस सुरू असताना बंगालच्या...
कृषी कायद्यांविरोधात पंजाबकडून स्वतंत्र...चंडीगड : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
खारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
प्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...