हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सोमवार (ता.
ताज्या घडामोडी
नांदेड ः वादळी पाऊस, गारपिटीमुळे खरीप पिके झोडपली
नांदेड ः सोयाबीनची सुगी, लवकर लागवड केलेल्या कपाशीची वेचणी, मूग, उडदानंतर रबीची पेरणी सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सततचा पाऊस नुकसानकारक ठरत आहे. या तीन जिल्ह्यात रविवारी (ता. ६) दुपारी वादळी वाऱ्यासह झालेला जोरदार पाऊस गारपिटीमुळे खरीप पिके झोडपून निघाली. सोयाबीनच्या शेंगा फुटल्या, कपाशीची पाने, बोंडे गळून पडली. हळदीच्या पानाच्या झिरमाळ्या झाल्या. दसरा सणाच्या पूर्वसंध्येला हाती आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, सोमवारी (ता. ७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील कुंटूर मंडळांमध्ये सर्वाधिक ९८ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ४५ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, लोहा, कंधार तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. वादळी वारे, गारपिटीमुळे सोयाबीन, कपाशीचे, हळद पिकांचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यातील २५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. सेलू, परभणी, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन, कपाशी आदी पिके झोडपून निघाली.
हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी ८ मंडळांमध्ये पाऊस झाला. वसमत तालुक्यात वादळी वारे, गारपीट झाली. त्यामुळे काढणीच्या अवस्थेतील सोयाबीनच्या शेंगा फुटून नुकसान झाले. हळद पिकांचे पाने फाटून झिरमाळ्या झाल्या. कपाशीचे बोंडे लागलेले पीक जमिनीवर आडवे झाल्याने झाडे मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले.
मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
नांदेड जिल्हा ः नांदेड शहर २२, तुप्पा ६५, विष्णुपुरी २९, वसरणी ४४, वजीराबाद १२, तरोडा ५, लिंबगाव ११, अर्धापूर १६, दाभड १८, मुगट ८, जलधारा ११, हिमायतनगर ४१, किनी ६, उमरी ७, सिंधी ९, गोळेगाव ३०, धर्माबाद १८, जारिकोट २९, नायगाव १०, नरसी ८, बरबडा १४, कुंटूर ९८, आदमपूर ६, मरखेल २८, हानेगाव २०, मुक्रमाबाद ११, कंधार ४५, उस्मानननगर २७, बारुळ १९, पेठवडज ११, फुलवळ १५, लोहा ३७, माळाकोळी ७, कलंबर ५८, शेवडी ९, सोनखेड ३४, कापसी १०.
परभणी जिल्हा ः परभणी शहर ६, पेडगाव ६, जिंतूर ९, सावंगी म्हाळसा १८, आडगाव ८, सेलू १८, देऊळगाव ३५, मानवत ३८, केकरजवळा ८, पाथरी १५, बाभळगाव ६, पालम ३०, चाटोरी १७, बनवस १८, पूर्णा २६, ताडकळस ३१, चुडावा १०.
हिंगोली जिल्हा ः वसमत ५, जवळाबाजार १९, साळणा ६.
- 1 of 581
- ››