नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या संशोधनासाठी वार्षिक दोन हजार कोटी रुपयांच
ताज्या घडामोडी
अतिवृष्टीचा देशात ६४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका : कृषिमंत्री तोमर
नवी दिल्ली : यंदा देशात मॉन्सूनचा आणि परतीच्या मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने देशात ६४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली.
नवी दिल्ली : यंदा देशात मॉन्सूनचा आणि परतीच्या मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने देशात ६४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत दिली.
देशात मॉन्सूनच्या काळात अनेक भागांत जोरदार अतिवृष्टी झाली. विशेषकरून सप्टेंबर महिन्यात खरीप पिकांना मोठा फटका बसला. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आले. पिकांना शेतातच कोंब फुटले तर अनेक ठिकाणी पिके पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली. खरिपातील कडधान्य, तेलबिया, कापूस, ऊस आदी पिकांना फटका बसला. परिणामी, अनेक राज्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत माहिती दिली.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये २७.४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. येथील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर आल्याने शेतीला मोठा फटका बसला. कर्नाटकात ९ लाख ३५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. उत्तर प्रदेशात आठ लाख ८८ हजार हेक्टर पिकांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला. मध्य प्रदेशातील सहा लाख ४ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली. तर महाराष्ट्रात ४ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. तसेच आसाममध्ये २ लाख १४ हजार, बिहारमध्ये २ लाख ६१ हजार, पंजाबमध्ये एक लाख ५१ हजार, ओडिशात एक लाख ४९ हजार आणि केरळमध्ये ३१ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात मॉन्सूनच्या काळात यंदा ११० टक्के पाऊस झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा ५० टक्के अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात खरीप पिके काढणीचा हंगाम सुरू होतो. नेमके याच काळात अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान आहे. यामुळे पिकांचे उत्पादन घटले आहे. कडधान्य, तेलबिया आणि भरडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यनिहाय सप्टेंबर महिन्यात झालेले पिकांचे नुकसान (लाखांत)
राजस्थान | २७.४ |
कर्नाटक | ९.३५ |
उत्तर प्रदेश | ८.८८ |
मध्य प्रदेश | ६.०४ |
महाराष्ट्र | ४.१७ |
२.१४ | आसाम |
बिहार | २.६१ |
- 1 of 1027
- ››