खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटका

जळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. अनेक बागांमध्ये फळांचे नुकसान झाले आहे. तर, काही बागा एकाच काढणीनंतर काढून फेकाव्या लागतील, असे चित्र आहे.
Heavy rains hit papaya crop in Khandesh
Heavy rains hit papaya crop in Khandesh

जळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. अनेक बागांमध्ये फळांचे नुकसान झाले आहे. तर, काही बागा एकाच काढणीनंतर काढून फेकाव्या लागतील, असे चित्र आहे.

लागवड सुमारे ५०० हेक्टरने वाढली आहे. एकट्या नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ४५०० हेक्टरवर लागवड झाली असून, पिकाची स्थिती काही भागात जोमात होती. पण, गेले १५ दिवस सतत पाऊस व ढगाळ, प्रतिकूल वातावरण आहे. यामुळे नंदुरबार, तळोदा, चोपडा, यावल, जळगाव आदी  काही भागात विषणाजून्य रोगांचा प्रकोप पिकात आहे. यंदा काढणी दसरा सणानंतर सुरू होईल, अशी अपेक्षा गेल्या पंधरवड्यात होती. परंतु, पिकाची स्थिती अतिपावसामुळे दिवसागणिक खराब झाली आहे. 

खानदेशात दरवर्षी पपईची लागवड वाढत आहे. पपईची काढणी जागेवरच केली जाते. विक्री व्यवस्था सुधारली आहे. परराज्यातील खरेदीदार येत असल्याने पपई लागवड नंदुरबार, जळगाव व धुळे  जिल्ह्यात वाढली आहे. गेल्या वर्षी खानदेशात सुमारे सहा हजार हेक्टरमध्ये लागवड झाली होती. यंदा ही लागवड सुमारे सहा हजार ५४० हेक्टरवर झाली आहे.  

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यात पपई पीक आहे. या भागात अतिपावसाचा फटका बसला आहे. कारण, सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पपईला मागील हंगामात जागेवरच सुरवातीला १८ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता. नंतर दरात पडझड झाली

वेळेपूर्वीच येणार काढणीची वेळ

वेळेपूर्वीच पपई काढणी करण्याची वेळ काही भागात येणार आहे. कारण, पाऊस थांबण्याच्या स्थितीत नाही. चोपडा, यावल, तळोदा, शहादा भागात तर रोज १० ते १२  मिनीटे जोरदार पाऊस पडतो. यामुळे वाफसा स्थितीच नाही. फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली. २० ते २५ टक्के नुकसान झाले. तसेच फळांचा आकारही हवा तसा नाही. पिकाची पाने पिवळी पडून गळत आहेत. यामुळे वाढही कमी झाली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पपईचे पीक यंदा बऱ्यापैकी आहे. दर जाहीर झालेले नाहीत. परंतु, २० रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळणे अपेक्षित आहे. - जितेंद्र पाटील, शेतकरी, जामनेर (जि.जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com