वादळी पावसाचा दणका

गुलाब चक्रीवादळाच्या प्रणालीमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि उत्तर कोकणातील जिल्ह्यांना चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी (ता. २७) मराठवाड्यात हाहाकार उडाल्यानंतर मंगळवारी (ता. २८) दिवसभर उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणासह मराठवाड्याच्या काही भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे.
Heavy rains hit the state
Heavy rains hit the state

पुणे : गुलाब चक्रीवादळाच्या प्रणालीमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि उत्तर कोकणातील जिल्ह्यांना चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी (ता. २७) मराठवाड्यात हाहाकार उडाल्यानंतर मंगळवारी (ता. २८) दिवसभर उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणासह मराठवाड्याच्या काही भागांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे. 

बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेल्या अतिमुसळधार पावसाने पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे सर्वाधिक १९३ मिलिमीटर, मोखेडा १९१, तलासरी १८०, विक्रमगड १७० मिलिमीटर, नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे १८२ मिलिमीटर, तर नाशिक जिल्ह्यातील हर्सूल येथे १५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नगर, जळगाव, नाशिक, नंदूरबार आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होत मुसळधार पाऊस पडला. तर सिंधुदुर्ग, धुळे, जालना जिल्ह्यांतही अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. तर उर्वरित राज्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. 

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : मुंबई शहर : सांताक्रूझ १०१, पालघर : डहाणू ९३, जव्हार १९३, मोखेडा १९१, पालघर ७०, तलासरी १८०, वसई ६३, विक्रमगड १७०, वाडा ११६, रायगड : अलिबाग ६४, कर्जत ७५, खालापूर ८८, माथेरान १३५, पनवेल ५८, पेण ६४, रत्नागिरी : दापोली ४०, सिंधुदुर्ग : दोडामार्ग ६७, कणकवली ४६, कुडाळ ९८, मालवण ५१, मुलदे (कृषी) ९१, ठाणे : अंबरनाथ ७०, भिवंडी १४२, कल्याण ८४, शहापूर ११५, ठाणे १०६. 

मध्य महाराष्ट्र : नगर : कोपरगाव ६१, नेवासा ५०, सावळीविहीर ७३, श्रीरामपूर १४०, धुळे : गिधाडे ५६, साक्री ५०, शिरपूर ७४, सिंदखेडा ५१, जळगाव : अंमळनेर ५०, भाडगाव ७०, चाळीसगाव ५४, दहीगाव ५९, धरणगाव ६४, जळगाव ६०, जामनेर ११०, मुक्ताईनगर ६०, पाचोरा ७०, पारेळा ७२, नंदूरबार : अक्कलकुवा १४०, अक्रणी ९५, नंदुरबार ११०, नवापूर ५५, शहादा १८२, तळोदा ११७, नाशिक : गिरणाधरण ७६, हर्सूल १५३, इगतपुरी १०९, नांदगाव ७९, ओझरखेडा ९८, पेठ १३२, सटाणा ५६, सुरगाणा १२०, त्र्यंबकेश्वर ९२, येवला १०५, पुणे : लोणावळा कृषी ८६, सातारा : महाबळेश्‍वर ५२. 

मराठवाडा : औरंगाबाद : गंगापूर ९२, कन्नड ७१, खुलताबाद १४०, पैठण ९८, फुलंब्री ५९, सिल्लोड ५७, सोयगाव ५९, वैजापूर १०९, हिंगोली : हिंगोली ५४, जालना : बदनापूर ६०, भोकरदन ५७, जालना ५०, नांदेड : अर्धापूर ६०. 

विदर्भ : बुलडाणा : बुलडाणा ६३. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com