Agriculture news in marathi, Heavy rains in Khandesh | Agrowon

खानदेशात पावसाचा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

जळगाव ः खानदेशात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे दोन महिन्यांतील पावसाचा ‘अनुशेष’ भरून निघाला आहे. सर्व प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे.

जळगाव ः खानदेशात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे दोन महिन्यांतील पावसाचा ‘अनुशेष’ भरून निघाला आहे. सर्व प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. वाघूर धरणात ९४ टक्के, हतनूर ४९, गिरणात ५४.३५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे आहेत. पण पीकस्थिती बिकट बनली आहे. पूर्वहंगामी कापूस पीक हातचे गेले आहे. तसेच सोयाबीन, ज्वारी पीक हाती येईल की नाही, या बाबतही प्रश्न आहे. 

कापूस पीक प्रमुख असून, नऊ लाख हेक्टरवर लागवड आहे. परंतु कापूस पिकाची स्थिती अधिक बिकट आहे. पीक लाल, पिवळे पडून कैऱ्या लाल, काळ्या होऊन खराब होत आहेत. नवीन फुले, पातेच नाही. पातेगळ प्रचंड झाली आहे. यापूर्वीच उडीद, मूग ही पिके दुष्काळी स्थितीने हातची गेली होती. सुमारे दोन ते अडीच लाख हेक्टरवरील कापूस पिकाला अतिपावसाचा फटका खानदेशात बसला आहे.

चोपडा, जळगाव, जामनेर, रावेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल या भागात कापूस पिकाची मोठी हानी झाली आहे. धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातही मोठे नुकसान झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विविध कृषी मंडळ स्तरावर १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाणीपातळीत वाढ झाली आहे. तीन मोठ्या, तसेच मध्यम, लघु प्रकल्पात सद्यःस्थितीत ६३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर- ४९.०२, गिरणा- ५४.३५, तर वाघूर- ९३.९९ टक्के, तर अन्य आठ प्रकल्प ओसंडले आहेत. मोठ्या धरणांसह मध्यम, लघु प्रकल्पांत सरासरी ६२.८७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धुळ्यातील मालनगाव, पांझरा, सोनवद, अनेर या प्रकल्पातील साठाही मुबलक आहे. बुराई प्रकल्पातील पाणीसाठा कमी आहे, अशी माहिती मिळाली.

‘हतनूर’मधून विसर्ग 

गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाच मिलिमीटर पावसाच्या नोंदीसह १२.८० दलघमी पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्पात ५४.३५ टक्के, हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात १७ मिलिमीटर पावसासह १६०.४७ दलघमी आवक आहे. प्रकल्पात ४९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. प्रकल्पाचे चार दरवाजे पूर्ण उघडून २७ हजार ७१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे.


इतर बातम्या
जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा...पुणे : राज्यात पुढील दोन दिवस जोरदार वारे,...
पुण्यात साकारतेय देशी गाय संशोधन आणि...पुणे ः देशी गायींच्या संवर्धनातून त्यांची...
विमा कंपन्यांना आठ हंगामांत १२ हजार...पुणे ः देशातील खासगी विमा कंपन्यांनी गेल्या आठ...
द्राक्ष हंगामात नियोजन आणि बाजारपेठेचे...अधिक परतावा देणारी पिके म्हणजे जोखीमही मोठी असते...
मागणीमुळे हरभरा दर हमीभावाच्या वर टिकूनपुणे : गेल्या आठवडाभरात हरभऱ्याला चांगली मागणी...
गुन्हा दाखल करण्याऐवजी पुन्हा चौकशीचा...पुणे ः जलयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मृद व...
शेतकरी आंदोलन लोकसभा  निवडणुकीपर्यंत...नगर : केंद्रातील भाजप सरकारने ठरविलेल्या...
सोयाबीन कापणीचा दर  एकरी तीन...अकोला : या हंगामात लागवड केलेले कमी कालावधीचे...
महुद ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद :...सोलापूर ः वसुंधरा आणि पृथ्वीच्या रक्षणासाठी...
सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासह  दर्जेदार...अमरावती : राजुरा बृहत लघु पाटबंधारे योजनेप्रमाणेच...
पारनेर कारखाना विक्रीतील  दोषींवर...नगर : नगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर...
वालचंदनगर (जि.पुणे) : लाळ्या खुरकूत...वालचंदनगर, जि. पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून...
सांगली : रब्बीचे पावणे तीन लाख हेक्टरवर...सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते,...
खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या ...चंद्रपूर : कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना...
सांगलीतील पूरग्रस्तांच्या  मदतीसाठी...सांगली : जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७१.३९ टक्...औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी...
नांदेडमधील प्रकल्पांत ८२.५७ टक्के...नांदेड : ऑगष्ट-सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला...
नंदुरबार जिल्ह्यात चार साखर कारखाने...जळगाव : खानदेशात उसाची लागवडदेखील बऱ्यापैकी आहे....
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास...सोलापूर ः ‘‘कृषी योजनांचा अधिकाधिक प्रसार करून...
‘‘हतनूर’मधून ३८८ दशलक्ष घनमीटर पाणी...जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ९०...