Agriculture news in marathi, Heavy rains in Khandesh | Agrowon

खानदेशात पावसाचा धुमाकूळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

जळगाव ः खानदेशात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे दोन महिन्यांतील पावसाचा ‘अनुशेष’ भरून निघाला आहे. सर्व प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे.

जळगाव ः खानदेशात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे दोन महिन्यांतील पावसाचा ‘अनुशेष’ भरून निघाला आहे. सर्व प्रकल्पांत ६३ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. वाघूर धरणात ९४ टक्के, हतनूर ४९, गिरणात ५४.३५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटण्याची चिन्हे आहेत. पण पीकस्थिती बिकट बनली आहे. पूर्वहंगामी कापूस पीक हातचे गेले आहे. तसेच सोयाबीन, ज्वारी पीक हाती येईल की नाही, या बाबतही प्रश्न आहे. 

कापूस पीक प्रमुख असून, नऊ लाख हेक्टरवर लागवड आहे. परंतु कापूस पिकाची स्थिती अधिक बिकट आहे. पीक लाल, पिवळे पडून कैऱ्या लाल, काळ्या होऊन खराब होत आहेत. नवीन फुले, पातेच नाही. पातेगळ प्रचंड झाली आहे. यापूर्वीच उडीद, मूग ही पिके दुष्काळी स्थितीने हातची गेली होती. सुमारे दोन ते अडीच लाख हेक्टरवरील कापूस पिकाला अतिपावसाचा फटका खानदेशात बसला आहे.

चोपडा, जळगाव, जामनेर, रावेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरंडोल या भागात कापूस पिकाची मोठी हानी झाली आहे. धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातही मोठे नुकसान झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विविध कृषी मंडळ स्तरावर १६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प पाणीपातळीत वाढ झाली आहे. तीन मोठ्या, तसेच मध्यम, लघु प्रकल्पात सद्यःस्थितीत ६३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी हतनूर- ४९.०२, गिरणा- ५४.३५, तर वाघूर- ९३.९९ टक्के, तर अन्य आठ प्रकल्प ओसंडले आहेत. मोठ्या धरणांसह मध्यम, लघु प्रकल्पांत सरासरी ६२.८७ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. धुळ्यातील मालनगाव, पांझरा, सोनवद, अनेर या प्रकल्पातील साठाही मुबलक आहे. बुराई प्रकल्पातील पाणीसाठा कमी आहे, अशी माहिती मिळाली.

‘हतनूर’मधून विसर्ग 

गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाच मिलिमीटर पावसाच्या नोंदीसह १२.८० दलघमी पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्पात ५४.३५ टक्के, हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात १७ मिलिमीटर पावसासह १६०.४७ दलघमी आवक आहे. प्रकल्पात ४९.०२ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. प्रकल्पाचे चार दरवाजे पूर्ण उघडून २७ हजार ७१६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे.


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...