Agriculture News in Marathi Heavy rains in Khandesh Cotton crop conditions are critical | Page 3 ||| Agrowon

खानदेशात अतिपावसाने  कापूस पीकस्थिती बिकट 

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 सप्टेंबर 2021

खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बिकट बनली आहे. अतिपावसाने पिकातील कैऱ्या, बोंडांचे मोठे नुकसान होत आहे. वेचणीवर आलेल्या कापसात बोंडांचा अक्षरशः चिखल बनत आहे. 
 

जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बिकट बनली आहे. अतिपावसाने पिकातील कैऱ्या, बोंडांचे मोठे नुकसान होत आहे. वेचणीवर आलेल्या कापसात बोंडांचा अक्षरशः चिखल बनत आहे. 

फक्त कापूस पीक तेवढेच खानदेशात बऱ्या अवस्थेत होते. परंतु या पिकालादेखील अतिपावसाने झोडपले आहे. यापूर्वी उडीद, मूग आदी पिके जून, जुलैमधील पावसाच्या ओढीने हातची गेली. दुबार, तिबार पेरणी करावी लागली. ऑगस्टच्या मध्यानंतर पावसाचे आगमन झाले. तेव्हापासून पाऊस सुरूच आहे.

ऑगस्टअखेर पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू होण्याची स्थिती होती. काही दिवस कोरडे वातावरण अपेक्षित होते. परंतु वातावरण खराब होत गेले. सतत पाऊस सुरू आहे. गेले १० दिवस जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पाऊस रोज येत आहे. यामुळे पिकांची स्थिती अधिक बिकट बनली आहे.

काही भागात उडीद, मूग ही पिके काढणीवर आहेत. सोयाबीन काढणीवर येत आहे. परंतु पाऊस सुरू असल्याने कापणी, वेचणी, काढणी, मळणी आदी कार्यवाही बंद आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कारण पीक हातचे जात आहे. 

खानदेशात पीक प्रमुख कापूस आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच लाख १८ हजार, धुळ्यात दोन लाख २० हजार आणि नंदुरबारात एक लाख १४ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. यात पूर्वहंगामी कापूस पिकाखालील क्षेत्र सुमारे सव्वालाख हेक्टर एवढे आहे. मेच्या अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली होती.

या पिकाची स्थिती ऑगस्टच्या सुरुवातीला चांगली होती. परंतु आता अतिपावसाने पीक लाल, पिवळे, काळे पडत आहे. कैऱ्या, बोंडे लालसर, काळवंडत आहेत. पिकाचा दर्जा सतत घसरत आहे. यामुळे उत्पादकतेवर मोठा परिणाम होत असून, शेतकऱ्यांनुसार एकरी फक्त तीन ते साडेतीन क्विंटल उत्पादन पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस पिकात मिळेल, अशी स्थिती आहे. उत्पादन खर्चही निघणार नाही, असेही शेतकरी सांगत आहेत. 

जळगाव, धुळे व नंदुरबारात अतिवृष्टी झाल्याची स्थिती आहे. जळगावमधील चाळीसगाव, जामनेर, जळगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, भडगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल या सर्वच तालुक्यांमध्ये काळ्या कसदार जमिनीत कापूस पिकाची स्थिती बिकट आहे. शेतातील सखल भागात पाणी तुंबले आहे. धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, साक्री भागातही कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार, अक्कलकुवा, नवापूर येथेही पूर्वहंगामी कापूस पिकात किमान ५० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. 

प्रतिक्रिया
कापूस पिकाची स्थिती अतिपावसाने बिकट बनली आहे. एकरी दोन ते तीन क्विंटलही उत्पादन येणार नाही. उत्पादन खर्चही हाती येईल की नाही, याबाबत शंका आहे. 
- राजाराम पाटील, शेतकरी, भडगाव, जि. जळगाव
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...