Heavy rains in Khandesh eroded lands
Heavy rains in Khandesh eroded lands

खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्या

जळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक भागात अति मुसळधार पाऊस झाल्याने जमिनी खरडल्याचा प्रकार घडला आहे. धुळे, नंदुरबार व जळगावात मिळून हे नुकसान सुमारे एक ते दीड हजार हेक्‍टरवर झाले आहे. पंचनामे झाले, परंतु भरपाई मिळालेली नसल्याची स्थिती आहे.

जळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक भागात अति मुसळधार पाऊस झाल्याने जमिनी खरडल्याचा प्रकार घडला आहे. धुळे, नंदुरबार व जळगावात मिळून हे नुकसान सुमारे एक ते दीड हजार हेक्‍टरवर झाले आहे. पंचनामे झाले, परंतु भरपाई मिळालेली नसल्याची स्थिती आहे.

मागील आठवड्यात शहादा तालुक्‍यातील कहाटूळ व इतर चार गावांमध्ये अति मुसळधार पाऊस झाला. त्यात सुमारे १०० एकरातील मिरची, पपई, कापूस ही पिके पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. नळ्या, माती वाहून गेली. जमिनी खरडल्याने नव्याने पेरणी कशी करायची? अशी स्थिती या भागात झाली. जूनमध्येही या भागात अति मुसळधार पाऊस झाला होता.

धुळे तालुक्‍यातील नंदाळे व भागातील सात- आठ गावांमध्येही जमिनी खरडल्या आहेत. मागील महिन्यात पहाटेच्या वेळेस अति मुसळधार पाऊस झाल्याने बंधारे फुटले. माती वाहून गेली. त्यासोबत भाजीपाला, कापूस ही पिकेही नष्ट झाली. या भागातही पंचनामे पूर्ण झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्‍यातही सातपुडा पर्वतालगतच्या तरडी, भवाळे आदी भागातही अति मुसळधार पावसाने जमिनी खरडल्या आहेत. या भागात पंचनामे करताना धरसोडपणाही झाला. शेतकरी पंचनाम्यांसाठी तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत.

जळगाव जिल्ह्यातही गिरणा, वाघूर नदीकाठच्या भागातही अति मुसळधार पाऊस झाला आहे. भडगाव, पाचोरा, धरणगाव, जामनेर या तालुक्‍यांमध्ये अति पावसात जमिनी खरडल्या आहेत. यामुळे कापूस, भाजीपाला पिकांची हानी झाली आहे. परंतु कुठेही नुकसानीचे  पंचनामे झालेले नाहीत. नुकसान कमी असल्याचे सांगून प्रशासनाने धरणगाव, जळगाव भागात पाहणीदेखील केलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com