कोकणात पावसाची दमदार हजेरी

राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात दमदार हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
कोकणात पावसाची दमदार हजेरी
कोकणात पावसाची दमदार हजेरी

पुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात दमदार हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. 

उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील तळा येथे राज्यातील सर्वाधिक १६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर म्हसळा येथे १३८ मिलिमीटर पाऊस पडला. बुधवारी (ता. २२) सकाळपासूनच कोकणात पावसाचा जोर वाढला होता. मराठवाड्यातील पैठण (जि. औरंगाबाद) येथे १०६ मिलिमीटर, पूर्व विदर्भातील मोहाडी १४० (जि. भंडारा) येथेही पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.  

बुधवारी (ता. २२) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)  कोकण :  मुंबई शहर : सांताक्रूझ ५९, पालघर : डहाणू ५७, जव्हार ९३, मोखेडा ८१, पालघर ६८, तलासरी ८०, विक्रमगड ६०, वाडा ८२ रायगड : कर्जत ६६, खालापूर ७५, महाड ६७, माथेरान ८८, म्हसळा १३८, पनवेल ७५, पेण ८४, रोहा ६५, तळा १६५, उरण ६८. रत्नागिरी : चिपळूण ५४, दापोली ७३, मंडणगड ८०, राजापूर ५७. सिंधुदुर्ग : कुडाळ ६३, मालवण ५६, मुलदे (कृषी) ५३, वेंगुर्ला ६९.

मध्य महाराष्ट्र :  नगर : शेवगाव ४७, जळगाव : चाळीसगाव ५९, कोल्हापूर : गगनबावडा ७५, नंदूरबार : नवापूर ६०, नाशिक : हर्सूल ५५, नांदगाव ८२, ओझरखेडा ९०, पेठ ९८, पुणे : लोणावळा ६६, सातारा : महाबळेश्‍वर ८४.

मराठवाडा : औरंगाबाद : पैठण १०६, खुलताबाद ४५, फुलंब्री ७९, बीड : अंबाजोगाई ६०, वाडवणी ४९, हिंगोली : कळमनुरी ४३, जालना : आंबड ४५, बदनापूर ७५, जाफराबाद ८४.

विदर्भ : भंडारा : मोहाडी १४०, तुमसर ४५, बुलडाणा : चिखली ५५, देऊळगाव राजा ४०, चंद्रपूर : चंद्रपूर ६१, गडचिरोली : गडचिरोली ६६, नागपूर : पारशिवणी ४५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com