Agriculture news in Marathi Heavy rains in Konkan | Agrowon

कोकणात पावसाची दमदार हजेरी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात दमदार हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. 

पुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात दमदार हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. 

उत्तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला. रायगड जिल्ह्यातील तळा येथे राज्यातील सर्वाधिक १६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर म्हसळा येथे १३८ मिलिमीटर पाऊस पडला. बुधवारी (ता. २२) सकाळपासूनच कोकणात पावसाचा जोर वाढला होता. मराठवाड्यातील पैठण (जि. औरंगाबाद) येथे १०६ मिलिमीटर, पूर्व विदर्भातील मोहाडी १४० (जि. भंडारा) येथेही पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.  

बुधवारी (ता. २२) राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) 
कोकण :  मुंबई शहर : सांताक्रूझ ५९, पालघर : डहाणू ५७, जव्हार ९३, मोखेडा ८१, पालघर ६८, तलासरी ८०, विक्रमगड ६०, वाडा ८२ रायगड : कर्जत ६६, खालापूर ७५, महाड ६७, माथेरान ८८, म्हसळा १३८, पनवेल ७५, पेण ८४, रोहा ६५, तळा १६५, उरण ६८. रत्नागिरी : चिपळूण ५४, दापोली ७३, मंडणगड ८०, राजापूर ५७. सिंधुदुर्ग : कुडाळ ६३, मालवण ५६, मुलदे (कृषी) ५३, वेंगुर्ला ६९.

मध्य महाराष्ट्र : नगर : शेवगाव ४७, जळगाव : चाळीसगाव ५९, कोल्हापूर : गगनबावडा ७५, नंदूरबार : नवापूर ६०, नाशिक : हर्सूल ५५, नांदगाव ८२, ओझरखेडा ९०, पेठ ९८, पुणे : लोणावळा ६६, सातारा : महाबळेश्‍वर ८४.

मराठवाडा : औरंगाबाद : पैठण १०६, खुलताबाद ४५, फुलंब्री ७९, बीड : अंबाजोगाई ६०, वाडवणी ४९, हिंगोली : कळमनुरी ४३, जालना : आंबड ४५, बदनापूर ७५, जाफराबाद ८४.

विदर्भ : भंडारा : मोहाडी १४०, तुमसर ४५, बुलडाणा : चिखली ५५, देऊळगाव राजा ४०, चंद्रपूर : चंद्रपूर ६१, गडचिरोली : गडचिरोली ६६, नागपूर : पारशिवणी ४५.


इतर बातम्या
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
आता तुम्हीच शोधा  कुठला कारखाना कुणी... पुणे : गेल्या पंधरा वर्षांत ६५ सहकारी साखर...
स्वाभिमानी-कारखानदार संघर्ष अटळ;  ‘...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू, गुरुदत्त,...
पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार  सुरू...पुणे : कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करून...
सोयीच्या लोकांची प्रकरणे  सोमय्या झाकून...पुणे : राज्यात एकूण ४३ कारखान्यांची विक्री...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी  नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६...
रब्बीत यंदाही राहणार  हरभऱ्याचाच...अकोला : लवकरच रब्बीची लागवड सुरू होत आहे. या...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
धुळे जिल्हा बँकेत तिघे जण बिनविरोधधुळे ः धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेची १७ जागांसाठी...
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ...बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा, खानदेशातील कापूस,...
`तंत्रज्ञान पोहोचविण्यात कृषी...हिंगोली  ः ‘‘कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान...
नांदेड जिल्ह्यात ग्रामबीजोत्पादनात सात...नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी सहा हजार ३१...
यवतमाळ :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ...आर्णी, यवतमाळ : परतीच्या पावसाने खरीप पिकांची...