कोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस 

कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येत्या रविवारपर्यंत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वदूर हलक्या सरी 
राज्यात सर्वदूर हलक्या सरी 

पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येत्या रविवारपर्यंत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत. आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला आँरेज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.  कमी दाब क्षेत्र तयार झाल्यानंतर ते पूर्व आणि मध्य भारतातून मॉन्सूनच्या आस असलेल्या कमी दाब क्षेत्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून अलिगड, जमशेदपूर या भागांतून अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मॉन्सून आस पश्‍चिम भाग उत्तरेकडे सरकला असून, पुढील दोन दिवस तो उत्तरेकडेच राहणार आहे. तर पूर्वेकडील भाग हा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर आहे.  अरबी समुद्रात पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारला आहे. वरील हवामान स्थिती पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडत असल्याने हवेत गारवा तयार झाला आहे. बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे ३२ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. 

येथे होणार जोरदार पाऊस : 

  • गुरुवार ः संपू्र्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया 
  • शुक्रवार ः संपू्र्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, वाशीम, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ 
  • शनिवार ः संपू्र्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती 
  • रविवार ः ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर 
  • राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली  वाढ :  शहर ---- कमाल तापमान (कंसात झालेली वाढ) 

  • पुणे - २८.१ (०.१) 
  • जळगाव - ३४.२ (१.७) 
  • कोल्हापूर - २४.७ (-२.१) 
  • महाबळेश्‍वर - १९.४ (-०.४) 
  • मालेगाव - २५.६ (-५.३) 
  • नाशिक - २५.९ (-२.६) 
  • सांगली - २६.७ (-२.२) 
  • सातारा - २६.८ (-०.१) 
  • सोलापूर - २९.२ (-२.५) 
  • मुंबई (कुलाबा) - ३१.० (१.१) 
  • अलिबाग - २७.२ (-२.८) 
  • रत्नागिरी - २७.४ (-१.६) 
  • डहाणू - २९.६ (-०.९) 
  • औरंगाबाद - २८.४ (-१.४) 
  • परभणी - ३२ (०.४) 
  • बीड- ३०.८ (१) 
  • अकोला - ३०.८ (-१.४), 
  • अमरावती - २९.४ (-०.९) 
  • बुलढाणा - २८.२ (-०.७) 
  • चंद्रपूर - ३१.२ 
  • गोंदिया - ३२.० (०.८) 
  • नागपूर - ३०.८ (-०.२) 
  • वाशिम -३२.६ 
  • वर्धा - ३१.२ (०.५) 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com