Agriculture news in marathi Heavy rains in Konkan till Sunday | Page 2 ||| Agrowon

कोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येत्या रविवारपर्यंत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येत्या रविवारपर्यंत कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत. आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला आँरेज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

कमी दाब क्षेत्र तयार झाल्यानंतर ते पूर्व आणि मध्य भारतातून मॉन्सूनच्या आस असलेल्या कमी दाब क्षेत्राकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून अलिगड, जमशेदपूर या भागांतून अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मॉन्सून आस पश्‍चिम भाग उत्तरेकडे सरकला असून, पुढील दोन दिवस तो उत्तरेकडेच राहणार आहे. तर पूर्वेकडील भाग हा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर आहे. 

अरबी समुद्रात पश्‍चिम किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत विस्तारला आहे. वरील हवामान स्थिती पोषक ठरल्याने कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडत असल्याने हवेत गारवा तयार झाला आहे. बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे ३२ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. 

येथे होणार जोरदार पाऊस : 

 • गुरुवार ः संपू्र्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया 
 • शुक्रवार ः संपू्र्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, वाशीम, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ 
 • शनिवार ः संपू्र्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती 
 • रविवार ः ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली 
वाढ : 

शहर ---- कमाल तापमान (कंसात झालेली वाढ) 

 • पुणे - २८.१ (०.१) 
 • जळगाव - ३४.२ (१.७) 
 • कोल्हापूर - २४.७ (-२.१) 
 • महाबळेश्‍वर - १९.४ (-०.४) 
 • मालेगाव - २५.६ (-५.३) 
 • नाशिक - २५.९ (-२.६) 
 • सांगली - २६.७ (-२.२) 
 • सातारा - २६.८ (-०.१) 
 • सोलापूर - २९.२ (-२.५) 
 • मुंबई (कुलाबा) - ३१.० (१.१) 
 • अलिबाग - २७.२ (-२.८) 
 • रत्नागिरी - २७.४ (-१.६) 
 • डहाणू - २९.६ (-०.९) 
 • औरंगाबाद - २८.४ (-१.४) 
 • परभणी - ३२ (०.४) 
 • बीड- ३०.८ (१) 
 • अकोला - ३०.८ (-१.४), 
 • अमरावती - २९.४ (-०.९) 
 • बुलढाणा - २८.२ (-०.७) 
 • चंद्रपूर - ३१.२ 
 • गोंदिया - ३२.० (०.८) 
 • नागपूर - ३०.८ (-०.२) 
 • वाशिम -३२.६ 
 • वर्धा - ३१.२ (०.५) 

इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...