Agriculture news in marathi Heavy rains in Koyna dam area | Agrowon

कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. बुधवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत धरणात सहा टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 

सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. बुधवारी सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत धरणात सहा टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 

पावसाने दडी मारल्याने धरणे भरणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सोमवार पासून पावसास सुरुवात झाल्याने धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. मंगळवारी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढत गेला. धरण क्षेत्रातील कोयना २४७, नवजा ३००, महाबळेश्वर ३०४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या दमदार पावसामुळे धरणात प्रतिसेंकद एक लाख ११ हजार क्यूसेक पाण्याची आवक होत होती. यामुळे धरणात २४ तासात सहा टीएमसीमे पाणीसाठ्यात वाढ झाली. 

सध्या धरणात ५५.१५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी ५५.८ इतकी आहे. इतर प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ होत आहे. सध्या धोम- ५.५१, धोम-बलकवडी- २.४६, कण्हेर- ५.०६, उरमोडी- ६.७४, तारळी- ३.०५, नीरा-देवघर ३.०६, भाटघर- ९.८६, वीर ३.७२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...