सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून चोवीस तासांत ८.९१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Heavy rains lashed Sangli district
Heavy rains lashed Sangli district

सांगली ः जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून चोवीस तासांत ८.९१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली धरणात पावसाचा जोर कायम असून धरणातून ४ हजार ४०० क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याने वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढ आहे. त्यामुळे धरणाचे चारही दरवाजे उघडून तीन हजार क्‍युसेक व वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा ४४०० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. आरळा शित्तुर पुलाला पाणी लागले तर कोकरूड - रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पाऊस व वारणा नदीचा पूर यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात तसेच चांदोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे धरणातील विसर्ग कोणत्याही क्षणी वाढवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हे धरण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. शिराळा तालुक्‍यातील अनेक गावांत संततधार पडणारा पाऊस व वाऱ्यामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बिऊर, भाटशिरगाव, मांगले, इंगरुळ, कापरी, शिराळा, पाडळी, पाडळेवाडी, खेड परिसरात यावर्षी विक्रमी आडसाली लागण झाली आहे. परंतु या महिन्यातील तीन ते चार तारखेपर्यंत सतत अतिवृष्टी व जोरदार वारा यामुळे ऊसपिके उन्मळून पडून भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या ऊस पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.जिल्ह्यातील इतर तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयना धरणामध्ये ६७.२७ टीएमसी पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com