Agriculture news in Marathi Heavy rains lashed Sindhudurg district | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता. २१) सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात पुराचे पाणी साचले असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुराचे पाणी घुसल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता. २१) सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात पुराचे पाणी साचले असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुराचे पाणी घुसल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज सकाळपासून देखील संततधार सुरूच आहे. वेंगुर्ल्यांत २६४ मिलिमीटर तर मालवणमध्ये २५४ मिलिमीटर  पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी काही भागात पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरा त्यामध्ये वाढ झाली.वेंगुर्ला, मालवण, दोडामार्ग, सांवतवाडी या तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या.त्यामुळे या तालुक्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली.

सांवतवाडी बाजारपेठेमध्ये पावसाचे पाणी साचून ते काही दुकानांमध्ये घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालेल्या वेंगुर्ला तालुक्याला पावसाचा मोठा दणका बसला. या तालुक्यातील अनेक मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तळवडा-होडावडे हा मुख्य मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या भागातील २७ गावांचा तालुक्याशी सपंर्क तुटला आहे. आंबोली घाटात दरड कोसळली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग, सांवतवाडी, वेंगुर्ला, कणकवली या तालुक्यातील भातशेतीत पुराचे पाणी घुसले आहे. अजून एक दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.हळवी भातपिके परिपक्व झाली असून त्या पिकांचे नुकसान अटळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान मंगळवारी (ता. २२) पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...