लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा ग्रामबिजोप्तादनाला बसणार फटका

लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत गेल्याने सोयाबीनचे पीक जोमदार आले होते. पण ऐन काढणीच्या वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका सोयाबीनला बसला आहे.
Heavy rains in Latur district will hit Gram Bijoptadana
Heavy rains in Latur district will hit Gram Bijoptadana

लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत गेल्याने सोयाबीनचे पीक जोमदार आले होते. पण ऐन काढणीच्या वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. याचा मोठा फटका सोयाबीनला बसला आहे. सततच्यापावसामुळे किडीचा प्रादूर्भाव आणि उभ्या पिकालाच शेंगा फुटण्याचे प्रकार झाले. यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षीसाठीच्या ग्रामबिजोत्पादनाला मोठा फटका बसणार आहे. 

लातूर जिल्हा सोयाबीनमध्ये अग्रेसर आहे. या वर्षी जूनच्या सुरवातीपासूनच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र तीन लाख ९१ हजार २९२ हेक्टर असताना प्रत्यक्ष पेरणी मात्र ४ लाख ५९ हजार ९७६ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. ११८ टक्के ही पेरणी आहे. सुरवातीच्या काळात महाबीजसह इतर कंपन्यांच्या बियाणेच उगवल्या नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या. याचा मोठा फटकाही शेतकऱ्यांना बसला. काही भागात दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

सप्टेंबरमध्ये सोयाबीन काढणीला येते. यावर्षी पाऊस चांगला राहिल्याने सोयाबीन पीकही दमदार आले होते.  दरम्यान, सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसला आहे. याचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. प्राथमिक, अंदाजानुसार एक लाख हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. हे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या ठिकाणचे क्षेत्र आहे. 

३३ टक्के पेक्षा कमी झालेले क्षेत्रही मोठे आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनवर किड, आळ्यापडून नुकसान झाले. तर, अनेक ठिकाणी उभ्या पिकाला कोंब फुटल्याने फटका बसला आहे. आता कृषी विभागाने पुढील वर्षासाठी ग्रामबिजोत्पादनाचे नियोजन सुरु केले आहे.

तीन लाख ३७ हजार क्विंटल बियाणे उत्पादनाचा इष्टांक ठेवण्यात आला आहे. पण, हे नियोजन कागदोपत्रीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी चांगले पिक आले आहे. तेथे शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षीसाठी बियाणे जतन करुन ठेवण्याची गरज आहे. अन्यथा, सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com