Agriculture news in Marathi, Heavy rains in most parts of Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात बहुतांशी भागांत जोरदार पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यातील कोथरूड येथे सर्वाधिक ७४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली होती, तर काही ठिकाणी रस्ते भरून वाहत होते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी रब्बी पिकांच्या तयारीसाठी हा पोषक पाऊस असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते.

पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यातील कोथरूड येथे सर्वाधिक ७४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली होती, तर काही ठिकाणी रस्ते भरून वाहत होते. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी रब्बी पिकांच्या तयारीसाठी हा पोषक पाऊस असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते.

परतीच्या पावसाने वाटचाल सुरू केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीट वाढल्याने वातावरणात सकाळपासून उकाड्यात वाढ झाली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने हवामान अधूनमधून ढगाळ होते. बुधवारी (ता. ९) सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर अचानक ढग जमा झाल्याने दुपारी पाच वाजेपासून जिल्ह्याच्या काही भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडला असून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.

सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू असून अनेक ठिकाणी रब्बीची तयारी सुरू झाली आहे. त्यातच हा पाऊस रब्बीसाठी पोषक असल्याने अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसत आहेत. हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरातही धो धो पाऊस पडला असून गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत येथे ७१ मिलिमीटर पाऊस पडला. तर पुणे शहर २१.३, खेड शिवापूर २०, भोसरी १२, कळस १३ मिलिमीटर पाऊस पडला. तर मुंढवा, थेऊर, उरुळी कांचन, हडपसर, चिंचवड हलका पाऊस पडला. 

मुळशी तालुक्यातील पिंरगुट ४० मिलिमीटर पाऊस पडला. तर पौड १९, घोटावडे २०, थेरगाव ३५, माले १२, मुठा २० मिलिमीटर पाऊस पडला. भोर तालुक्यातील बहुतांशी भागांत जोरदार पाऊस पडला. तर नसरापूर येथे सर्वाधिक ५७ मिलिमीटर पाऊस पडला. तर किवडी ४५, वेळू ४०, आंबवडे १९, भोर ३८, भोलावडे १४, संगमनेर ५४, निगुडघर १२ मिलिमीटर पाऊस पडला. मावळमधील खडकाळा येथे १२ मिलिमीटर पाऊस पडला. तर तळेगाव, काळे कॉलनी, लोणावळा, शिवणे येथे हलका पाऊस पडला. 

वेल्हा तालुक्यातील आंबवणे येथे ३२ मिलिमीटर पाऊस पडला. तर वेल्हा शहरात १४, पानशेत २५, विझर १९ मिलिमीटर पाऊस पडला. तर जुन्नर शहरात २० मिलिमीटर पाऊस पडला असून अनेक भागात पावसाने उघडीप दिली होती.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात ६५.१६ टक्के मतदाननगर : नगर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या बारा मतदार...
कोल्हापूर जिल्ह्यात ७४.०८ टक्के मतदानकोल्हापूर ः गेल्या महिन्याच्या कालावधीतील...
४७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये मुळा...राहुरी, जि. नगर : मुळा धरणात १९७२ पासून पाणी...
खानदेशात जोरदार पाऊस, वाघूर, हतनूर...जळगाव  ः खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची...
जळगाव जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील...जळगाव  ः पावसामुळे जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा...
अकोल्यासह बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा...अकोला : या भागात अकोला तालुक्यात तसेच...
रब्बी हंगामात अकोला जिल्ह्यात होणार...अकोला  ः यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला...
मराठवाड्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे...औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यात ४२१ पैकी ३०१...
परभणीत गेल्या रब्बीतील ज्वारी,...परभणी : गतवर्षी (२०१८-१९) च्या रब्बी हंगामात...
मुसळधारेमुळे रब्बी हंगाम लांबण्याची...सांगली, कोल्हापूर  : जिल्ह्यात सोमवारी...
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...