नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस

नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग पाचव्या दिवशी पावसाने सर्वदूर हजेरी लावली. या तीन जिल्ह्यांतील ३० तालुक्यांतील १४९ मंडळांत बुधवारी (ता. ३१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे काही मंडळांतील ओढे, नाले, नद्या प्रवाहित झाल्या; परंतु परभणी जिल्ह्यात रिमझिम पावसाने आंतरमशागतीची कामे खोळंबली. बुधवारी दुपारपर्यंत अनेक मंडळांत ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. माहूर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर, हदगाव, कंधार, भोकर तालुक्यांतील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. माहूर तालुक्यातील वाई, वानोळा, सिंदखेड मंडळामध्ये दमदार पाऊस झाला. देगलूर तालुक्यात मोठ्या पावसाची गरज आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ३९ मंडळामध्ये हलका पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. परंतु काही मंडळे वगळता बहुतांश मंडळात रिमझिम सुरू आहे. त्यामुळे खरीप पिकांतील खुरपणी, कोळपणी, वखरणी आदी आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी येत असल्याने फवारणीदेखील करता येत नसल्याची स्थिती आहे. भीज पाऊस पडत असल्याने जमिनीमधील ओलावा वाढण्यासाठी मदत होत आहे. परंतु मोठ्या पावसाअभावी ओढे, नाले, नद्या अद्याप कोरड्या आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारनंतर काही भागांत जोरदार पाऊस झाल्याने ओढे, नाले, कयाधू नदीला पाणी आले. कळमनुरी सालेगाव रस्त्यावरील सांडस गावाजवळी पूल ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी.) 

नांदेड जिल्हा नांदेड १९, नांदेड ग्रामीण २३, वजीराबाद २०, वसरणी १७, तरोडा २२, लिंबगाव १३, तुप्पा १६, विष्णुपुरी १५, अर्धापूर ३९, मालेगाव ४९, दाभड ३७, मुदखेड २०, मुगट १८, बारड १८, हदगाव ३२, तामसा ३२, मनाठा ३५, पिंपरखेड ४२, आष्टी १८, निवघा ३८, तळणी ४१, माहूर ६०, वाई ६७, वानोळा ७०, सिंदखेड ७५, किनवट ५०, इस्लापूर ३४, मांडवी २९, बोधडी ४०, दहेली ५९, जलधारा ४०, शिवणी ४८, हिमायतनगर २२, सरसम ५३, जवळगाव ५१, भोकर २८, किनी ५४, मोघाली १४, मातुल १९, उमरी १३, सिंदी ११, गोलेगाव १८, धर्माबाद ११, जारिकोट १९, करखेली २७, नायगाव २२, नरसी १६, मांजरम १८, बरबडा २३, कुंटूर २८, बिलोली १०, कुंडलवाडी १२, सगरोळी १२, आदमपूर २५, लोहगाव १८, देगलूर ४, खानापूर १२, शहापूर ८, मरखेल १२, मालेगाव २, हानेगाव १९, मुखेड २५, जांब ३०, येवती १०, जाहूर ७, चांदोळा २४, मुक्रमाबाद ९, बाऱ्हाळी ४, कंधार २८, फुलवल ३७, उस्मानननगर १८, बारुळ ४०, पेठवडज ४१, कुरुळा ३१, लोहा  २०, माळाकोळी १५, कलंबर १६, शेवडी १५, सोनखेड १२, कापसी १८.
परभणी जिल्हा परभणी ८, परभणी ग्रामीण ६, सिंगणापूर ८, पिंगळी ६, जांब ९, पेडगाव १०, झरी १३, बोरी ११, जिंतूर १९, चारठाणा ११, बामणी ३१, सावंगी म्हाळसा ३६, आडगाव १७, सेलू ७, देऊळगाव २०, कुपटा १०, वालूर ९, चिकलठाणा १६, मानवत ८, केकरजवळा ९, कोल्हा ७, पाथरी ११, बाभळगाव ६, हदगाव ५, सोनपेठ ११, आवलगाव १३, गंगाखेड ७, राणीसावरगाव ८, माखणी ७, महातपुरी ८, पालम १३, चाटोरी ९, बनवस १०, पूर्णा १४, ताडकळस ९, चुडावा १९, लिमला ७, कात्नेश्वर ११.
हिंगोली जिल्हा हिंगोली ३४, खंबाळा १५, माळहिवरा ३४, सिरसम ३९, बासंबा ६, नरसी नामदेव ११, डिग्रस ५२, कळमनुरी ४६, नांदापूर २३, आखाडा बाळापूर ५४, डोंगरकडा ३१, वारंगा फाटा २६, वाकोडी २७, सेनगाव २४, गोरेगाव ३२, आजेगाव २१, पानकनेरगाव २६, हत्ता ३५, वसमत २४, हट्टा २६, कुरुंदा २०, टेंभुर्णी १८, आंबा ३५, हयातनगर २५, औंढा नागनाथ ५६, जवळा बाजार २६, येळेगाव १०, साळणा २२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com