नांदेड, परभणी, हिंगोलीत मुसळधार पावसामुळे ओढे वाहिले

गावाच्या शिवारात एक ते सव्वा तास मुसळधार पाऊस झाला. ओढ्या, नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने जमिनी खरडल्या.बियाणे वाहून गेल्याने नुकसान झाले. - शेख मोबीन, महादेव राऊत,शेतकरी, मांडाखळी,जि.परभणी
Heavy rains in Nanded, Parbhani and Hingoli
Heavy rains in Nanded, Parbhani and Hingoli

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १३८ मंडळांमध्ये मंगळवारी (ता.१६) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पाथरी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे ओढे नाले प्रवाहित झाले. शेताचे बांध फुटले.

जमिनी खरडून गेल्या. नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोमवारी (ता.१५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मांडेवडगाव (ता.मानवत) शिवारातील ओढ्याच्या पुरात बैलगाडी उलटली. त्यामुळे शेतकरी व एक मुलगी वाहून गेली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील ७७ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३५ मंडळांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला. परभणी, पाथरी, पू्र्णा तालुक्यातील अनेक मंडळांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जमिनी खरडून गेल्या. नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. त्यावर गाळ येऊन बसला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. हिंगोली जिल्ह्यातील २६ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.  मंडळनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये) 

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर २९, नांदेड ग्रामीण २७, तुप्पा ५२, विष्णुपुरी २१, वसरणी ३०, वजीराबाद २५, तरोडा २८, लिंबगाव ३८, अर्धापूर १२, दाभड १४, मालेगाव १९, मुदखेड १५, मुगट १९, बारड ११, हदगाव १५, तामसा ११, मनाठा १५, तळणी १७, आष्टी ८, माहूर १४, वानोळा ४२, वाई १८, सिंदखेड २७, किनवट १३, मांडवी ४२, बोधडी ७, दहेली ४६, शिवणी १०, सरसरम १७, भोकर १४, किनी २२, मातुल १२, उमरी ४१, सिंधी २५, गोळेगाव १५,धर्माबाद ३२, करखेली २१, नायगाव ५, नरसी १०, मांजरम ६, बरबडा १५, कुंटूर २०, बिलोली ५,आदमपूर ६, लोहगाव २२, सगरोळी १०, कुंडलवाडी ८, देगलूर २३, शहापूर ९ मुखेड २२, जांब २५, येवती १५, जाहूर २४, चांडोळा १३, मुक्रमाबाद ६, बाऱ्हाळी १९, कंधार ६, कुरुला ९, उस्माननगर ३४, पेठवडज ११, फुलवळ ५, बारुळ ५, लोहा १५, माळाकोळी ७, कलंबर ६३, शेवडी १२, सोनखेड ४५, कापसी २२.  परभणी जिल्हा ः परभणी शहर ३७, परभणी ग्रामीण ३२, सिंगणापूर २२, दैठणा १९, पेडगाव ५०, पिंगळी ३८, जांब २७, बामणी ७, सेलू ८, मानवत २०, केकरजवळा ४८, कोल्हा ९, पाथरी ८२, बाभळगाव २७, हादगाव २८, गंगाखेड ९, माखणी ५, महातपुरी ९, सोनपेठ १५, आवलगाव ७, पालम २६, चाटोरी ६, पूर्णा ३०, ताडकळस २०, चुडावा ५४, लिमला १४, कात्नेश्वर १५.  हिंगोली जिल्हा ः हिंगोली ः १६,खंबाळा १२,माळहिवरा १६, सिरसम ७, नरसी नामदेव ६, डिग्रस १२, कळमनुरी १२,नांदापूर १६, वाकोडी १४, हट्टा १६, गिरगाव ८, कुरुंदा ५, टेंभुर्णी ६, आंबा ३०, हयातनगर २०, येळेगाव ५, गोरेगाव ३०.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com