Agriculture news in marathi Heavy rains in Nanded, Parbhani and Hingoli | Page 2 ||| Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत मुसळधार पावसामुळे ओढे वाहिले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जून 2020

गावाच्या शिवारात एक ते सव्वा तास मुसळधार पाऊस झाला. ओढ्या, नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने जमिनी खरडल्या. बियाणे वाहून गेल्याने नुकसान झाले. 
- शेख मोबीन, महादेव राऊत, शेतकरी, मांडाखळी,जि.परभणी 

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १३८ मंडळांमध्ये मंगळवारी (ता.१६) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पाथरी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे ओढे नाले प्रवाहित झाले. शेताचे बांध फुटले.

जमिनी खरडून गेल्या. नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोमवारी (ता.१५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मांडेवडगाव (ता.मानवत) शिवारातील ओढ्याच्या पुरात बैलगाडी उलटली. त्यामुळे शेतकरी व एक मुलगी वाहून गेली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील ७७ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३५ मंडळांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस झाला. परभणी, पाथरी, पू्र्णा तालुक्यातील अनेक मंडळांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जमिनी खरडून गेल्या. नुकतेच पेरणी केलेले बियाणे वाहून गेले. त्यावर गाळ येऊन बसला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. हिंगोली जिल्ह्यातील २६ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. 

मंडळनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये) 

नांदेड जिल्हा ः नांदेड शहर २९, नांदेड ग्रामीण २७, तुप्पा ५२, विष्णुपुरी २१, वसरणी ३०, वजीराबाद २५, तरोडा २८, लिंबगाव ३८, अर्धापूर १२, दाभड १४, मालेगाव १९, मुदखेड १५, मुगट १९, बारड ११, हदगाव १५, तामसा ११, मनाठा १५, तळणी १७, आष्टी ८, माहूर १४, वानोळा ४२, वाई १८, सिंदखेड २७, किनवट १३, मांडवी ४२, बोधडी ७, दहेली ४६, शिवणी १०, सरसरम १७, भोकर १४, किनी २२, मातुल १२, उमरी ४१, सिंधी २५, गोळेगाव १५,धर्माबाद ३२, करखेली २१, नायगाव ५, नरसी १०, मांजरम ६, बरबडा १५, कुंटूर २०, बिलोली ५,आदमपूर ६, लोहगाव २२, सगरोळी १०, कुंडलवाडी ८, देगलूर २३, शहापूर ९ मुखेड २२, जांब २५, येवती १५, जाहूर २४, चांडोळा १३, मुक्रमाबाद ६, बाऱ्हाळी १९, कंधार ६, कुरुला ९, उस्माननगर ३४, पेठवडज ११, फुलवळ ५, बारुळ ५, लोहा १५, माळाकोळी ७, कलंबर ६३, शेवडी १२, सोनखेड ४५, कापसी २२. 

परभणी जिल्हा ः परभणी शहर ३७, परभणी ग्रामीण ३२, सिंगणापूर २२, दैठणा १९, पेडगाव ५०, पिंगळी ३८, जांब २७, बामणी ७, सेलू ८, मानवत २०, केकरजवळा ४८, कोल्हा ९, पाथरी ८२, बाभळगाव २७, हादगाव २८, गंगाखेड ९, माखणी ५, महातपुरी ९, सोनपेठ १५, आवलगाव ७, पालम २६, चाटोरी ६, पूर्णा ३०, ताडकळस २०, चुडावा ५४, लिमला १४, कात्नेश्वर १५. 

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ः १६,खंबाळा १२,माळहिवरा १६, सिरसम ७, नरसी नामदेव ६, डिग्रस १२, कळमनुरी १२,नांदापूर १६, वाकोडी १४, हट्टा १६, गिरगाव ८, कुरुंदा ५, टेंभुर्णी ६, आंबा ३०, हयातनगर २०, येळेगाव ५, गोरेगाव ३०. 

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...