Agriculture news in marathi heavy rains in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

नाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. मात्र, शनिवारी (ता.२०) अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली आहे.

नाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. मात्र, शनिवारी (ता.२०) अतिवृष्टी झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. अनेक ठिकाणी हंगामातील हा विक्रमी पाऊस नोंदविला गेला.

निफाड तालुक्यातील देवगाव मंडळात सर्वाधिक ११० मिमी पाऊस झाला. त्यामुळे या हंगामातील हा विक्रमी पाऊस ठरला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन, बाजरी, मका ही पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. मात्र, शनिवारी (ता.१९) दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर, रात्री अनेक भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे हा झालेला पाऊस शेतकऱ्यांसाठी अडचणीचा विषय ठरतो आहे. त्यामुळे नुकसान अधिक प्रमाणावर वाढणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सर्वधिक पावसाची नोंद देवळा तालुक्यात ७९.४ मिमी झाली. तर, कळवण ७९ मिमी, चांदवड ७७ मिमी व सिन्नर ७१ मिमी झाली. येवला, नांदगाव, मालेगाव, दिंडोरी, बागलाण, सुरगाणा, निफाड तालुक्यातील अनेक भागात पावसाचा जोर होता. नाशिक, इगतपुरी व पेठ तालुक्यात पाऊस कमी होता. सर्वात कमी पावसाची नोंद त्र्यंबकेश्वर तालुक्यात ३ मिमी इतकी झाली. 

अतिवृष्टीसदृश पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध ओलांडून पाणी वाहिले. तर, काही ठिकाणी शेतातून माती वाहून गेली. बाजरीची पिके सोंगणीला आहेत. ती पिके आडवी होऊन खराब झाली. 

पंचनामे करण्याची मागणी 

खरीप कांदा लागवड, लेट खरीप व रब्बीची कांदा रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाली आहेत. तर, मका आणि सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी तातडीने पीक नुकसान पाहणी करून पंचनाम्याचे आदेश देऊन दिलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...