नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

नाशिक : मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोरदिसून आला. प्रामुख्याने सटाणा, देवळा, येवला वइगतपुरी तालुक्यात पावसाने जोरदार सलामी दिली.
Heavy rains in Nashik district
Heavy rains in Nashik district

नाशिक : मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचा जोर दिसून आला. प्रामुख्याने सटाणा, देवळा, येवला व इगतपुरी तालुक्यात पावसाने जोरदार सलामी दिली. अनेक ठिकाणी पाणीच पाणी होऊन ओढे, नाले वाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता खरीप हंगामाच्या कामांना गती येणार आहे. 

जिल्ह्यात बुधवारी (ता.९) दुपारी दोन वाजेनंतर पाऊस झाला. उत्तर पूर्व भागात पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद सटाणा तालुक्यातील वीरगाव व इगतपुरी मंडळात ५१ मिलिमीटर इतकी झाली. येवला तालुक्यातील आंदरसूल मंडळात १८ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र अंगुलगाव, गारखेडा, खरवंडी, भारम, वाघाळा, अंगुलगाव, कोळम, रेंडाळे या तालुक्याच्या पूर्व भागात नोंदी पेक्षा अधिक पाऊस झाला. अनेक भागात नाला बडिंग तुंबून गेल्या. रस्त्यांवरून पाणी वाहिले. 

अंगुलगाव येथील बंधारा पहिल्यांदाच एका पावसात भरल्याचे येथील शेतकरी सुभाष जाधव यांनी  सांगितले.

पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात वेळेवर पेरण्या सुरू होण्याची चिन्हे आहेत. पूर्व भागात मृग नक्षत्राच्या पावसात सर्वत्र पाणी तुंबल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या भागात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र विहिरींना पाणी उतरल्यानंतर येथील काही अंशी पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. 

देवळा तालुक्यातील उमराने परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरण्यांची लगबग सुरू होईल. चांदवड, नांदगाव, मालेगाव, पेठ, नाशिक, कळवण, त्र्यंबकेश्वर तालुक्यात मध्यम पाऊस झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com