Agriculture news in Marathi, Heavy rains the next day in drought areas | Page 2 ||| Agrowon

साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍यांना सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दिलासा दिला. रब्बी हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार असून, टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. पश्चिमेकडील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर तसेच खंडाळा, कोरेगाव तालुक्यातही कमी अधिक स्वरूपात पाऊस झाला आहे. 

सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍यांना सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दिलासा दिला. रब्बी हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार असून, टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. पश्चिमेकडील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर तसेच खंडाळा, कोरेगाव तालुक्यातही कमी अधिक स्वरूपात पाऊस झाला आहे. 

माण, खटाव तालुक्याच्या अनेक भागात गुरूवारी दुपारपासून पावसास सुरवात झाली. माण तालुक्यातील पिंगळी, वाघमोडेवाडी, गोंदवले बुद्रुक परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे गोंदवले येथील मोदळ ओढ्याला पाणी वाहिले. या ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने मंदिर परिसरातील छोटा बंधारा वरच्या भागाकडून दोन ते अडीच फूट कोसळला. 

त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याच्या लोटाने मंदिर परिसराची संरक्षक भिंत वाहून गेली. हा ओढा माणगंगा नदीला जाऊन मिळत असल्याने नदी सुमारे दहा वर्षांनंतर दुथडी भरून वाहिली. चिलारेवाडीपावसामुळे जलसंधारणाच्या कामात पाणी साचले होते. वळई येथे डोंगरावर झालेल्या पावसामुळे ओढ्यास पुराचे स्वरूप आले. 

या मुसळधार पावसामुळे वळई-म्हसवड दरम्यान असलेल्या ओढ्यावरील पूल तुटून वाहतूक विस्कळित झाली. या पावसाबरोबर जोरदार वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मुसळधार पावसाने वळई, विरळी, कुकुडवाड येथील चारा छावणीमध्ये पाणी साचले होते. पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे, नाले खळाळून वाहिले तर बंधारे भरून गेले. 

मलवडी या गावाच्या दक्षिणेकडील बाजूस सत्रेवाडी, शिरवली परिसरात पडलेल्या पावसामुळे ओढ्याला पूर आला होता. आजच्या पावसाने माणगंगेच्या उगमाकडील कळसकरवाडी, गाडेवाडी, शिंदी खुर्द येथील नदी पात्र प्रवाहित होऊन पाणी भांडवली हद्दीत आले आहे. तिथून पुढील नदी पात्र अजूनही कोरडेच आहे. खटाव तालुक्यातील मायणी परिसरातही दुसऱ्या दिवशीही परिसरात पावसाने हजेरी लावली. 

खंडाळा, कोरेगाव याही दुष्काळी तालुक्यातही पाऊस झाला आहे. या पावसाने दुष्काळी जनतेस दिलासा मिळणार असून पिण्याच्या पाण्याची टंचाईही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पश्चिमेकडील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर कमी अधिक पाऊस झाला आहे.  
 

इतर ताज्या घडामोडी
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...