agriculture news in marathi, heavy rains in North India | Agrowon

उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूच

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

सिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे विविध दुर्घटनेत गेल्या चोवीस तासात १८ जण मृत्युमुखी पडले असून नऊ जण जखमी झाले आहेत. हिमाचलच्या अनेक जिल्ह्यात पूर आल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला आहे. दरड कोसळणे आणि भुस्खलनामुळे ३२३ रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग ५ वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हिमाचलशिवाय उत्तराखंड, राजस्थान, पंजाबच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिमाचलमध्ये पावसामुळे विविध दुर्घटनेत गेल्या चोवीस तासात १८ जण मृत्युमुखी पडले असून नऊ जण जखमी झाले आहेत. हिमाचलच्या अनेक जिल्ह्यात पूर आल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला आहे. दरड कोसळणे आणि भुस्खलनामुळे ३२३ रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग ५ वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हिमाचलशिवाय उत्तराखंड, राजस्थान, पंजाबच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हिमाचलमध्ये विविध कारणामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले आहेत. सिमला येथे ८, कुलू आणि सिरमौर, सोलन आणि चंबा येथे प्रत्येकी दोन आणि उना व लाहोल स्पिटी जिल्ह्यात प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडले आहेत. सिमल्याजवळ आरटीओ कार्यालयाजवळ भूस्खलनच्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य एका घटनेत एका व्यक्तीचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच भिंत कोसळून एका मजुराचा मृत्यू झाला. याशिवाय कुलू जिल्ह्यात रोहरु येथे भुस्खलनामुळे एकाचा मृत्यू झाला. पावसामुळे झाड कोसळून २ नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी चंबा येथे पुरात एक जण वाहून गेला. विविध घटनांमुळे राज्यातील ३२३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. धर्मशाळा येथे ११४ मिलिमीटर, डलहौसी आणि चंबा येथे ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लाहौल स्पिटी जिल्ह्यात मनालीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कोकसर येथे पुलाची हानी झाल्याने वाहतूक थांबविली आहे. याशिवाय मनाली-लेह मार्गावर भूस्खलन झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पंजाबमध्ये छत कोसळून तीन ठार
पंजाबमध्ये अनेक भागात पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पंजाबच्या खन्ना शहरातील ओल गावात घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. सुरजित सिंग, त्यांची पत्नी बालजिंदर कौर आणि मुलगा गुरप्रित सिंग अशी मृतांची नावे आहेत. सुदैवाने दहा वर्षाची मुलगी या दुर्घटनेतून बचावली. दरम्यान, गुरुदासपूर जिल्ह्यात बियास नदीला आलेल्या पुरातून सुमारे ११ जणांना वाचविण्यात यश आले. बियास नदीच्या काठावर असलेले चाचैन शोरियान गावातील नागरिक वाहून गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार मोहीम राबवत अकरा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.रावी आणि बियास नदीला सध्या पूर आला असून सखल भागात जाणे नागरिकांनी टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

उत्तरकाशीत ढगफुटी; पाच बेपत्ता
हिमाचल प्रदेशाव्यतिरिक्त उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले आहे. उत्तरकाशीत पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. पाणी पातळी वाढल्याने एसडीआरएफ,रेड क्रॉस, आयटीबीपी आणि एनडीआरएफचे पथके तैनात केली आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोरी तहसीलतंर्गत ढगफुटी झाल्याने टोन्स नदीला पूर आला आहे. तसेच वीस घरे वाहून गेली आहेत. पावसामुळे पाच जण बेपत्ता झाले.

 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...