उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला.
 Heavy rains in Osmanabad, Latur, Beed
Heavy rains in Osmanabad, Latur, Beed

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (ता.३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. 

जवळपास तीन दिवसांपासून मराठवाड्यात पूर्व मोसमी पावसाची हजेरी सुरू आहे. बुधवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४४ मंडळांत १ ते २० मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील एकूण ५० मंडळांपैकी ४४ मंडळात १ ते ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडळांतील कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातील नित्रुड मंडळात सर्वाधिक ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५१ मंडळांत पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ४० मंडळांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, भूम, लातूर जिल्ह्यातील जळकोट, अहमदपूर, उदगीर, बीड जिल्ह्यातील आष्टीत २० मिलीमीटरच्या पुढे पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

औरंगाबाद जिल्हा :  पैठण २२, नांदर २६, गंगापूर २३ ,मांजरी २२. 

जालना जिल्हा :  जालना २२, रामनगर ३०, पाचनवडगाव ३६ तळणी २० ,धनगर पिंपरी २२ , राणीउचेगाव २२ ,तीर्थपुरी ३०, अंतर्वली टेंभी २४  बीड जिल्हा :  आष्टी ३९,कडा ३३, धामणगाव ४४, दौलावडगाव ४०, पिंपळा २२, चकलांबा २४, पाचेगाव २२, जातेगाव ३१, वडवणी ४२, वडगाव बुद्रुक २७, अंबाजोगाई ३१, ममदापूर २२, माजलगाव ३३, गंगामसला ३०, दिंद्रुड ५२ , नित्रुड ८३, तालखेड २६, मुखेड २२ , तेलगाव ६२, नागापूर २३, पिंपळगाव गाढे २२. 

लातूर जिल्हा : हरंगुळ बु २१, तांदुळजा २३, उदगीर ४६, मोघा २१, नळगीर ४३, नागलगाव २४ , अहमदपूर ३५ ,खंडाळी २३, अंधोरी २३, जळकोट २७, पानचिंचोली २२, देवणी २२, बोरोळ २५    उस्मानाबाद जिल्हा :  उस्मानाबाद ग्रामीण २२, तुळजापूर २०, कलंब ३३, मोहा २३, भूम २९, वीट ३८, मानकेश्वर २०, तेरखेडा ३१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com