परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २४२ गावांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ३३ हजार ९२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Heavy rains in Parbhani affected 34,000 hectares of crops
Heavy rains in Parbhani affected 34,000 hectares of crops

परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २४२ गावांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ३३ हजार ९२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे केले जात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

सोमवार (ता. १२) ते गुरुवार (ता. २२) या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्‌भवली. नाले, ओढे, नद्यांच्या पुराचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरले. सखल भागातील जमिनीवरील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हळद, भाजीपाला, फळपीके पिके पाण्याखाली गेली. बांध फुटले, जमिनी खरखडून गेल्या. पुरामध्ये जनावरे वाहून गेली. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ३३ हजार २३७ हेक्टरवरील जिरायती पिके, ६०० हेक्टरवरील बागायती, ९० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील २४२ गावांत गोदावरी, दुधना, पूर्णा, करपरा, गळाटी, लेंडी आदी नद्यांसह ओढे नाल्यांच्या पुरांचा फटका बसला आहे. जिंतूर तालुक्यात पाझर तलाव फुटल्याने जमिनी खरडून गेल्या आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक पीकहानी झाली आहे. जिरायती पिकांचे नुकसान सर्वाधिक आहे. स्थळ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान क्षेत्राची अंतिम व्याप्ती स्पष्ट होईल.

३१३ जनावरे दगावली... पालम तालुक्यात १ व्यक्तीचा मृत्यू झाला. ओढे, नाले, नद्यांच्या पुरामध्ये लहान, मोठी ३१३ जनावरे दगावली. त्यात शिर्शी बुद्रुक (ता. परभणी)  येथील २४८ मेंढ्याचा समावेश आहे. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील मिळून एकूण ४१ मोठी जनावरे दगावली. घरात पाणी घुसल्याने परभणी तालुक्यातील ७५०  घरे, जिंतूर तालुक्यातील २०० घरे, पाथरी तालुक्यातील १० घरे असे एकूण ९६० घरांचे नुकसान झाले आहे. मानवत तालुक्यातील ३, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी २ असे एकूण ९ घरांची अंशतः पडझड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com