Agriculture news in Marathi Heavy rains in Parbhani affected 34,000 hectares of crops | Page 2 ||| Agrowon

परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके बाधित

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २४२ गावांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ३३ हजार ९२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २४२ गावांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ३३ हजार ९२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे केले जात आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली.

सोमवार (ता. १२) ते गुरुवार (ता. २२) या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती उद्‌भवली. नाले, ओढे, नद्यांच्या पुराचे पाणी उभ्या पिकांमध्ये शिरले. सखल भागातील जमिनीवरील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हळद, भाजीपाला, फळपीके पिके पाण्याखाली गेली. बांध फुटले, जमिनी खरखडून गेल्या. पुरामध्ये जनावरे वाहून गेली. महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ३३ हजार २३७ हेक्टरवरील जिरायती पिके, ६०० हेक्टरवरील बागायती, ९० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांतील २४२ गावांत गोदावरी, दुधना, पूर्णा, करपरा, गळाटी, लेंडी आदी नद्यांसह ओढे नाल्यांच्या पुरांचा फटका बसला आहे. जिंतूर तालुक्यात पाझर तलाव फुटल्याने जमिनी खरडून गेल्या आहेत. परभणी तालुक्यात सर्वाधिक पीकहानी झाली आहे. जिरायती पिकांचे नुकसान सर्वाधिक आहे. स्थळ पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान क्षेत्राची अंतिम व्याप्ती स्पष्ट होईल.

३१३ जनावरे दगावली...
पालम तालुक्यात १ व्यक्तीचा मृत्यू झाला. ओढे, नाले, नद्यांच्या पुरामध्ये लहान, मोठी ३१३ जनावरे दगावली. त्यात शिर्शी बुद्रुक (ता. परभणी)  येथील २४८ मेंढ्याचा समावेश आहे. परभणी, जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील मिळून एकूण ४१ मोठी जनावरे दगावली. घरात पाणी घुसल्याने परभणी तालुक्यातील ७५०  घरे, जिंतूर तालुक्यातील २०० घरे, पाथरी तालुक्यातील १० घरे असे एकूण ९६० घरांचे नुकसान झाले आहे. मानवत तालुक्यातील ३, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी २ असे एकूण ९ घरांची अंशतः पडझड झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...