कारंजालाड, जि.
ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने मंगळवारी (ता. २४) सायंकाळी जोरदार हजेरी लावली. दौंड तालुक्यातील वरवंड येथे सर्वाधिक १३१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे वरसगाव, टेमघर, पानशेत, कासारसाई, वीर, घोड, वडज या धरणांतून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. यामुळे खरीप हंगामातील तूर, कपाशी या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. बुधवारी (ता. २५) दिवसभर हवामान ढगाळ असून, अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र होते.

पुणे जिल्ह्यात सोमवारपासून पावसास सुरवात झाली आहे. मंगळवारीही दिवसभर हवामान ढगाळ होते. सायंकाळनंतर जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी पावसाने जोर धरला. रात्रभर जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती.
हवेली तालुक्यातील पुणे शहरात सर्वाधिक ८७ मिलिमीटर पाऊस पडला. तर कोथरूड, खडकवासला, थेऊर, खेड शिवापूर, हडपसर, भोसरी, केशवनगर, उरूळी कांचन, चिंचवड येथेही जोरदार पाऊस पडला. तर वाघोली, कळस येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मुळशीतील थेरगाव येथे ६५ मिलिमीटर पाऊस पडला. तर पौड, घोटावडे, माले, मुठा, पिरंगुट येथेही जोरदार पाऊस पडला.
भोरमधील वेळू येथे सर्वाधिक ११६ मिलिमीटर पाऊस पडला. तर संगमनेर, आंबवडे, किकवी, नसरापूर, भोलावडे, भोर येथेही मुसळधार पाऊस पडला. मावळातील तळेगाव येथेही ८० मिलिमीटर पाऊस पडला असून, वडगाव मावळ ६२ मिलिमीटर पाऊस पडला. तर काळे कॉलनी, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे येथेही हलका ते मध्यम पाऊस पडला. वेल्ह्यातही पानशेत, विंझर, आंबवणे येथेही हलका स्वरूपाच्या सरी बरसल्या. बारामतील वडगाव येथे १३० मिलिमीटर पाऊस पडला. मोरगाव, उंडवडी, सुपा, लोणी भापकर, बारामती, माळेगाव, पणदरे येथेही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. इंदापुरातील काटी येथे ९१.६ मिलिमीटर पाऊस पडला. सणसर येथे ५३, बावडा ४२ मिलिमीटर पाऊस पडला.
- 1 of 582
- ››