Agriculture news in Marathi Heavy rains in Ratnagiri district | Agrowon

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी, काजळी नद्यांना पूर आला आहे. काजळीच्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले होते. सुदैवाने मोठे नुकसान झालेले नाही. बावनदीचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरले.

रत्नागिरी : जिल्ह्यात वेगवान वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी, काजळी नद्यांना पूर आला आहे. काजळीच्या पुरामुळे चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले होते. सुदैवाने मोठे नुकसान झालेले नाही. बावनदीचे पाणी माखजन बाजारपेठेत शिरले.

मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ९२.७१ मिलिमीटरमी पावसाची नोंद झाली आहे. विविध ठिकाणी झालेली पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये ः मंडणगड १०२.३०, दापोली ७०.८०, खेड ९८.६०, गुहागर ११०.६०, चिपळूण ८३.६०, संगमेश्वर १४२.३०, रत्नागिरी ३३.३०, राजापूर ६०.३०, लांजा ६५.८० पावसाची नोंद झाली आहे.

सोमवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. रात्री उशिरा आणि सकाळीही पावसाबरोबर सोसाट्याचा वारा सुटला होता. जगबुडी नदी, काजळी नदी आदींनी धोक्याची पातळी ओलांडली  आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई पुलाला काजळी नदीच्या पुराचे पाणी लागले. पाणी वाढू लागल्याने बाजारपेठ भागातील व्यापारी व रहिवाशांनी रात्र जागून काढली. मंगळवारी सकाळी बाजारपेठ भागातही पाणी भरू लागले आहे. तसेच कोरोनामुळे चार महिने बाजारपेठ बंद होती. आता पुरामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होणार आहे. व्यापाऱ्यांनी आपले साहित्य, माल सुरक्षित स्थळी नेला आहे.

राजापूर, संगमेश्‍वर आदी भागात जोरदार पाऊस पडत असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा अजून कायम असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. समुद्राला उधाण असल्याने किनारी भागातील गावांनाही सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पडझड झाली आहे. बावनदीचे पाणी माघझन बाजार पेठेत घुसले. किनारी भागाततील भातशेती पाण्याखाली गेली आहे. मच्छिमार यांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...