Agriculture news in marathi Heavy rains receded in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जून 2020

सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. त्यानंतर आज (ता.४) पावसाचा जोर काहिसा ओसरला. मात्र, काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.

सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी वाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. त्यानंतर आज (ता.४) पावसाचा जोर काहिसा ओसरला. मात्र, काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. निसर्ग चक्री वादळामुळे किरकोळ पडझडीचे प्रकार घडले. मात्र शेती, फळे, बागायतीचे फारसे नुकसान झाले नसल्याची स्थिती आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी भातपेरणीला सुरूवात केली आहे. 

सकाळपासून शेतकरी मळ्यांमध्ये जोत, पॉवर ट्रिलर नांगरणी करताना दिसत होते. गेले दोन, तीन दिवस चांगला पाऊस झाला. दरम्यान बुधवारी सकाळपासून वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जिल्ह्याला अक्षरक्ष झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत सुसाट्याचे वारे आणि पाऊस सुरू होता. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. वादळाच्या शक्यतेने जिल्हयातील ६५ हुन अधिक नागरिकांचे स्थंलांतर केले होते. आठ ते दहा नागरिकांच्या घरावर वादळाने झाडे कोसळली. त्यामुळे सुमारे ३ लाखांहून अधिक नुकसान झाले. 

गुरूवारी सकाळपासून मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. वारा देखील थांबला आहे. पावसाच्या सरी काही भागात कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजपासून भात पेरणीला सुरूवात केली. चांगला पाऊस आणि दोन दिवसांवर आलेला मृग, यामुळे बहुतांशी शेतकरी पहाटेपासूनच मळ्यामध्ये उतरल्याचे चित्र दिसत होते. मळ्यांमध्ये बैलांचे जोत, पावर ट्रीलर, पावर विडर, दिसून येते होते. गावागावांतील मळे शेतकऱ्यांनी गजबजलेले दिसत होते. दरम्यान सिंधुदुर्गात गुरूवारी सकाळपर्यंत ३९ मि.मी पावसाची नोंद झाली. 
...... 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...