सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार

सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला.
  Heavy rains in Sangli district
Heavy rains in Sangli district

सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला. चांदोली धरण परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी चारपर्यंत आठ तासात ७५ मि.मी पावसाची नोंद झाली. पहाटे पासून पावसाची संततधार कायम सुरू आहे. मृग नक्षत्रापूर्वीच पावसाने दमदार सुरवात केल्याने लोकांच्या गतवर्षाच्या महापुराच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आहेत. 

शिराळा हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एप्रिल आणि मे महिन्यात पाचवेळा वळीवच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागततीच्या कामांना गती मिळाली. तालुक्यात धुळवापेवर भातपेरणी अंतिम टप्यात आली आहे. गेले दोन दिवस पावसाची रिमझिम सुरु होती. मात्र, बुधवारी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे.

हा पाऊस भात उगवणीस उपयुक्त आहे. ऊस पिकाला ही पाण्याची गरज होती. लोकांनी भाताचे तरु पेरण्यास सुरवात केली आहे. आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मणदूर ते चांदोली धरणादरम्यान मुख्य रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने कर्मचाऱ्यांना धरणावर जाण्यास काही तास अडचण निर्माण झाली होती. सायंकाळी झाड तोडून वाट रस्ता मोकळा करण्यात आला.  शिराळ्यातील मंडलनिहाय पाऊस 

शिराळा १७, कोकरूड,१३ मांगले २६, शिरशी २१, सागाव २०,चरण ३० वारणावती १५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com