सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस

सातारा ः जिल्ह्याच्या बहुतांशी भागात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. विजेच्या कडकडाटासह दुष्काळी तालुक्यांना सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढले आहे. यामुळे अनेक तलाव, सिमेंट बंधारे, नद्या दुथडी भरून वाहिल्या आहेत. हा दुष्काळी तालुक्यांना फायदेशीर तर पश्चिमेकडील तालुक्यांना नुकसानकारक ठरत आहे. 

जिल्ह्यातील बहुतांशी भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने झोडपण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने दिवसभर उघडीप दिली होती. सायंकाळपासून पावसास सुरवात झाली. दुष्काळी माण, खटाव, फलटण तालुक्यांत विजेच्या कडकडाटासह सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. 

फलटण शहरासह तालुक्यातील सर्व ठिकाणी सुमारे तीन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. आदर्की मंडळ वगळता इतर सर्व मंडळांत पावसाच्या दमदार हजेरीने नदीनाले दुथडी भरून वाहिले. फलटण तालुक्याला गेले तीन दिवस सलग रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

या तालुक्यातील जिंती गावात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढ्याचे पाणी गावात पाणी पसरले होते. निरगुडी, गिरवी, धुमाळवाडी या परिसरांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निरगुडी व धुमाळवाडी या गावांमधील ओढ्याला पूर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. माण, खटाव तालुक्यांना सलग दिवशी पावसाने झोडपून काढले आहे. गंगोती तलाव पाण्याने भरून वाहिला आहे. 

माणगंगा नदी वाहती झाली असून अनेक पाझर तलाव, सिमेंट बंधारे भरून वाहत आहे. माण, खटाव, फलटण या तीन दुष्काळी तालुक्यात सरासरी ६० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. कोरेगाव व खंडाळा तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. पश्चिमेकडील वाई, सातारा, जावळी, कराड तालुक्यातही मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. पिकांत पाणी साचल्याने पीक कुजण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यात २४ सरासरी ६२.२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये  : सातारा ७५.७८, जावळी ७८.६०, पाटण ३४, कऱ्हाड ७१, कोरेगाव ४८.८९, खटाव ६९.९२, माण ६०.४३, फलटण ६०.३३, खंडाळा ५९.९०, वाई ८६.६०,  महाबळेश्वर २६.८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com