सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस 

जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) सकाळी आठपर्यंत सरासरी ५२.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Heavy rains in Satara district
Heavy rains in Satara district

सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) सकाळी आठपर्यंत सरासरी ५२.७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून दमदार पावसास सुरुवात झाली होती. पश्चिम भागातील जावली, पाटण, कोरेगाव, सातारा, कराड, खंडाळा, वाई, कोरेगाव, खंडाळा तालुक्यात पावसाचा जोरदार पाऊस झाला आहे. महाबळेश्‍वर तालुरक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतात पाणी पाणी केले आहे. वाऱ्यामुळे काही ठिकामी आडसाली ऊसाचे पीक आडवे झाले आहे. 

माण, खटाव व फलटण तालुक्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पाण्याअभावी शिल्लक असलेल्या भात लागणीसही हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. 

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये  सातारा- ५४.६७, जावळी- ९६.७५, पाटण-७९.५५, कराड-३३.००, कोरेगाव-३४.००, खटाव-१५.२९, माण- ८.८६, फलटण- ६.६७, खंडाळा- ४२.३०, वाई ५१.७१, महाबळेश्वर-२९०.६३.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com