नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात मंडळांमध्ये जोरदार पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात मंडळांमध्ये जोरदार पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील सात मंडळांमध्ये जोरदार पाऊस

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४६ मंडळांत शुक्रवारी (ता. २०) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील २, परभणीतील ३, हिंगोलीतील २ मंडळांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे तेथील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहिल्या. पालम तालुक्यात नद्यांना आलेल्या पुरांमुळे ११ गावांचा संपर्क काही काळ तुटला. रब्बी हंगामातील पेरणीसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे .परंतु, काढणीच्या अवस्थेतील मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे भिजून नुकसान होत आहे.

नांदेड जिल्ह्यांतील ८० पैकी ७७ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, नायगाव, कंधार, धर्माबाद, देगलूर, मुखेड तालुक्यांतील अनेक मंडळामध्ये चांगला पाऊस झाला. लिंबगाव आणि अर्धापूर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.

परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील काही मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. बनवस, पूर्णा, चुडावा मंडळांमध्ये ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहिल्या. ताडकळस ते पालम रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. सेनगाव, वसमत, औंढानागनाथ तालुक्यात चांगला पाऊस झाला. सेनगाव तालुक्यातील साखरा आणि हत्ता मंडळामध्ये जोरदार पाऊस झाली.

मंडळनिहाय पाऊस (३० मि.मीच्या पुढे) ः 

नांदेड जिल्हा नांदेड शहर ३४. तुप्पा ३९, विष्णुपुरी ४४, वसरणी ४५, वजीराबाद ४५, तरोडा २७, लिंबगाव ८१, मुदखेड २९, मुगट १७, बारड ६३, अर्धापूर ८५, दाभड ३०, मालेगाव ३४, मोगाली ३२, मातुल ३५, सिंदी ५८, गोळेगाव ४४, मांजरम ४१, बरबडा ४२, चांदोला ४५, मुक्रमाबाद ४४, कंधार ५३, कुरुला ४३, उस्माननगर ३५, पेठवडज ३१, फुलवळ ३४, लोहा ४५, कलंबर ३५, कापसी ४०.
परभणी जिल्हा झरी ३६, सावंगी म्हाळसा ५७, बामणी ४८, सेलू ३२, देऊळगाव ३५, मानवत ४५, केकरजवळा ४०, पाथरी ५९, बाभळगाव ४५, हदगाव ५२, सोनपेठ ४१, गंगाखेड ३०, राणीसावरगाव ३०,चाटोरी ५८, बनवस ११०, पूर्णा ६६, ताडकळस ५६, चुडावा ८९, लिमला ३२, कात्नेश्वर ४०.
हिंगोली जिल्हा साखरा ६७, कुरुंदा ४८, आंबा ५७, औंढा नागनाथ ३५, येळेगाव ४८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com