Agriculture news in Marathi Heavy rains in Sindhudurg | Agrowon

सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जून 2020

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पावसाने सोमवारी  (ता. १) सायकांळी चारनंतर दमदार हजेरी लावली. दरम्यान रविवारी (ता. ३१) विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला.

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात माॅन्सूनपूर्व पावसाने सोमवारी  (ता. १) सायकांळी चारनंतर दमदार हजेरी लावली. दरम्यान रविवारी (ता. ३१) विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे आगमन झाले. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वांची ताराबंळ झाली. जिल्ह्यातील वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता. दरम्यान प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. दरम्यान सांयकाळी तीन पासून विजांचा कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. सह्याद्री पट्ट्यातून पावसाला सुरुवात झाली.

जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ३१ मे ते ४ जून या कालावधीत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत अरबी समुद्रात जोरदार वारे वाहणार आहेत. तर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय समुद्र किनारपट्टी गावातील तलाठी, ग्रामसेवकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभाग प्रमुखांनी या कालावधीत मुख्यालय सोडू नये, अशी सूचना देखील प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...
पुण्यात सर्वच भाजीपाल्याच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
अन्नधान्यासह हाताला काम मिळणे गरजेचे ः...नाशिक : आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक...
तापमान वाढीची प्रक्रिया रोखण्यासाठी...ओस्लो (नॉर्वे) येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल...