सिंधुदुर्गमध्ये दमदार पाऊस;  वातावरणात बदल, मॉन्सूनची चाहूल 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मॉन्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. काही भागांत हलक्या सरी पडत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला असून, हा बदल मॉन्सूनची चाहूल मानली जात आहे.
 सिंधुदुर्गमध्ये दमदार पाऊस;  वातावरणात बदल, मॉन्सूनची चाहूल  Heavy rains in Sindhudurg; Climate change, the onset of monsoon
सिंधुदुर्गमध्ये दमदार पाऊस;  वातावरणात बदल, मॉन्सूनची चाहूल  Heavy rains in Sindhudurg; Climate change, the onset of monsoon

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मॉन्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. काही भागांत हलक्या सरी पडत आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला असून, हा बदल मॉन्सूनची चाहूल मानली जात आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात रविवारी (ता. ३०) सायकांळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडल्या. सोमवारी (ता.३१) सकाळपासून देखील जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या परिसरात पावसाच्या चांगल्या सरी कोसळत आहेत  किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये हलका पाऊस होत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. हवेत गारवा जाणवत असून, अशा प्रकारचे वातावरण मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी जिल्ह्यात जाणवते. त्यामुळे बदललेले हे वातावरण मॉन्सूनची चाहूल मानली जात आहे. सध्या मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर आहे. केरळात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात मॉन्सून सदृश वातावरण तयार होते. पावसाचे प्रमाण देखील वाढते. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. भात बियाणे खरेदी, खत खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. येत्या एक दोन दिवसांत चांगला पाऊस झाला तर शेतकरी पेरणीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com