Agriculture news in marathi Heavy rains in Sindhudurg district | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात गुरूवारी (ता.२) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.

सिंधुदुर्ग ः सिंधुदुर्गात गुरूवारी (ता.२) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. रात्रभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर किंचीत कमी झाला आहे. मात्र, चांगला पाऊस झाल्यामुळे भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीला आवश्‍यक पाऊस पडत नव्हता. एक- दोन दिवस संध्याकाळच्या वेळेत पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु, त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी भातरोपे लागवडीची कामे रखडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचे वातावरण होते.

दरम्यान गुरूवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे नदी-नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. रखडलेल्या भातलावणीला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर किंचीत कमी झाला.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...