सिंधुदुर्गमध्ये मुसळधार

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी करूळ, भुईबावडा घाट (ता. वैभववाडी) आणि नडगिवे येथे दरड कोसळली. त्यामुळे तीनही मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस,  बंधाऱ्यात पडून एकाचा मृत्यू  Heavy rains in Sindhudurg, One died after falling into the embankment
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस,  बंधाऱ्यात पडून एकाचा मृत्यू  Heavy rains in Sindhudurg, One died after falling into the embankment

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी करूळ, भुईबावडा घाट (ता. वैभववाडी) आणि नडगिवे येथे दरड कोसळली. त्यामुळे तीनही मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. कणकवली, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस झाला तर उर्वरित तालुक्यांमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, बंधाऱ्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उंबर्डे (ता. वैभववाडी) येथे घडली आहे. जिल्ह्यात दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाने जिल्ह्यातील तीनही घाटरस्त्यांची पाहणी केली.  रविवारी मध्यरात्री जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कणकवली, दोडामार्ग आणि सांवतवाडी या तीन तालुक्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष झोडपून काढले. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील करूळ आणि भुईबावडा घाटात दरडी कोसळल्या. त्यामुळे दोन्ही घाटमार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. तर नडगिवे घाटीत देखील मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. तीनही ठिकाणच्या दरडी जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आल्या. दरम्यान, दरडी कोसळलेल्या करूळ आणि भुईबावडा घाटाची पाहणी एनडीआरएफच्या पथकाने केली. या शिवाय फोंडाघाटची पाहणी देखील केली.  मुसळधार पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे येथील बंधारा पाण्याने भरला असून, या बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज आल्याने आदम बापू नाचरे, या ५५ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाण पावसामुळे पडझडीचे प्रकार घडले आहेत. आचरा हिर्लेवाडी येथील अशोक मुणगेकर यांच्या घरावर झाड कोसळून घराचे नुकसान झाले. जांभवडे येथील शांताराम विठ्ठल पवार यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्या तरी पावसाचा जोर ओसरला आहे. भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटविण्याचे काम एनडीआरएफच्या पथकाकडून सुरू होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com