Agriculture news in marathi Heavy rains in six circles in Hingoli | Agrowon

हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

हिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हिंगोली, डिग्रस कऱ्हाळे, कळमनुरी, नांदापूर, आखाडा बाळापूर, औंढा नागनाथ या ६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.

हिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हिंगोली, डिग्रस कऱ्हाळे, कळमनुरी, नांदापूर, आखाडा बाळापूर, औंढा नागनाथ या ६ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांना पूर आले. जमिनी खरडून गेल्यामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, हळद, ज्वारी आदी पिकांचे अपरिमित नुकसान झाले.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरवाड्यापासून पाऊस सुरु आहे. गेल्या काही दिवसांत वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुरुंदा, गिरगाव आदी मंडळांतील अनेक गावातील पिकांचे खूप नुकसान झाले. मंगळवारी (ता.२२) पहाटे पाचच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील सहा मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

हिंगोली मंडळात सर्वाधिक ११४.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर डिग्रस मंडळात ६८ मिमी, नरसी नामदेव मंडळात ३२ मिमी, सिरसममध्ये २९ मिमी, माळहिवरात ३९.२ मिमी, खंबाळात २५ मिमी पाऊस झाला. 

ओढे, नाले भरुन वाहिल्याने कयाधू नदीला पूर आला. कळमनुरी तालुक्यातील पाच मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यापैकी तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. कळमनुरी मंडळात सर्वाधिक ९४.३ मिलीमीटर, नांदापूर मंडळात ७४.३ मिमी,आखाडा बाळापूर मंडळात ६५ मिमी, वाकोडी मंडळात ४२.३ मिमी, वारंगा मंडळात ३६ मिमी पाऊस झाला.

वसमत तालुक्यातील आंबा मंडळात १८.३ मिमी, औंढा नागनाथ तालुक्यात औंढा नागनाथ मंडळात ८० मिमी, येळेगाव मध्ये ४९.८, साळणामध्ये २३.५ मिमी, जवळा बाजार मंडळात २२.८ मिमी पाऊस झाला.सेनगाव तालुरक्यातील मंडळात मध्यम पाऊस झाला. 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...