Agriculture news in marathi Heavy rains in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता.१७) पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली.

सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता.१७) पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात सर्वदूर हा पाऊस झाला. प्रामुख्याने सांगोला, पंढरपूर, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ भागात पावसाचा सर्वाधिक जोर राहिला. माळशिरस तालुक्यात शिंगोर्णी ओढ्याच्या पाण्यात एकजण वाहून गेला. 

यंदा हंगामाच्या सुरवातीपासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. जून आणि जुलैने पावसाची सरासरी ओलांडली आहे. ऑगस्टमध्ये पावसाने काहिशी विश्रांती घेतली. पण, सप्टेंबरमध्ये मात्र त्याने पुन्हा सुरुवात केली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस होतो आहे. बुधवारी त्याचा जोर अधिक राहिला.

दुपारपासून सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत थांबून-थांबून सुरुच होता. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्याचा जोर वाढला. सुमारे अर्धा - पाऊणतास पाऊस पडल्यानंतर तो थांबला. त्यानंतर पहाटे पुन्हा त्याने जोर लावला. 

या पावसामुळे सांगोल्यातील महूद येथील कासाळ ओढा भरुन वाहू लागला. पंढरपुरातील खर्डी येथेही अनेक भागात ताली भरल्या. जवळच्या नाल्यातही बरेच पाणी साठले. उत्तर सोलापूर, मोहोळ भागात बहुतांश छोटे-मोठे पाझर तलाव निम्मे, तर काही भरले. दुपारी बारा वाजेपर्यंत पावसाची रिपरिप थांबून-थांबून सुरुच होती. 

बुधवारी (ता.१६) माळशिरसमधील शिंगोर्णी ओढ्यातील पाण्यामध्ये बाळासाहेब खरे (वय-४५ रा. पिलीव) हे मेडिकल दुकानदार वाहून गेले. ते त्यांच्या कारमधून आटपाडीहून पिलीवकडे निघाले होते. 


इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...